चीनमध्ये मुलाला जन्माला घातल्यास 1.30 लाख मिळणार, ‘वन चाइल्ड पॉलिसी’ महागात पडली
चीनमध्ये सात वर्षापूर्वी वन चाईल्ड पॉलिसीची अंमलबजावणी केली. परंतु, या पॉलिसीचा चीनला जबरदस्त फटका बसला असून यामुळे जन्मदरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता चीनने वन चाइल्ड पॉलिसीला थांबवले असून जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चीनमध्ये मूल जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला चीन सरकार 1.30 लाख रुपये देणार आहे. एखाद्या जोडप्याने मूल जन्माला घातल्यास त्याला सरकारकडून दरवर्षी 3600 युआन म्हणजेच 44 हजार रुपये देणार आहे. या जोडप्याला तीन वर्षे हे पैसे मिळणार आहेत. जगातील मोठय़ा देशांमध्ये चीनचा जन्मदर सर्वात कमी आहे आणि तो सतत कमी होत आहे. त्यामुळे चीनने हा निर्णय घेतला आहे. अवघ्या सात वर्षात चीनमध्ये जन्मदर 50 टक्क्यांनी कमी झाला. ज्या पालकांची मुले तीन वर्षापेक्षा कमी वयाची आहेत त्यांना सरकार दरवर्षी रोख रक्कम देईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List