Skin Care – त्वचेवर ग्लो येण्यासाठी अशा पद्धतीने काळजी घ्यायलाच हवी
आपल्याला प्रत्येकाला आपली स्किन ही ताजी टवटवीत असावी असे वाटत असते. याकरता आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकविध उपाय करतो. प्रत्येक स्त्रीला तिची त्वचा चमकदार आणि डागरहित हवी असते. याकरता अनेक प्रकारे आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रयोग करत असतो. परंतु चेहरा धुताना काही चुका मात्र आपल्याकडून होत असतात. आपण रोज चेहरा धुताना काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्वचेसंदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्याने त्वचेशी संबंधित समस्या तर कमी होतील. यासोबत आपली त्वचाही चमकदार होईल.
Skin Care – आता ब्लॅकहेड्स होतील दूर ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर
चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला तर त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते. थंड पाण्याने चेहरा धुण्याने त्वचेची छिद्र घट्ट होतात. यामुळे चेहऱ्यावरील घाण योग्यरित्या साफ होत नाही.
चेहरा धुण्यासाठी उत्तम म्हणजे कोमट पाण्याचा वापर करणे. यामुळे त्वचेची छिद्र उघडण्यास आणि घाण पूर्णपणे साफ होण्यास मदत होईल. तसेच त्वचेची आर्द्रता देखील टिकून राहील.
Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा ग्लो
चेहरा खूप वेळा धुतलात तर त्वचेचे नैसर्गिक तेल वाढू लागते. यामुळे मुरुमे आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवतात. यामुळे आपल्या त्वचेची आर्द्रता देखील नाहीशी होते.
चेहरा धुताना जोरात घासलात तर जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. म्हणून चेहरा धुताना घासणे टाळा. त्याच वेळी चेहरा धुतल्यानंतर तो हलक्या हाताने पुसून वाळवा किंवा मऊ मायक्रोफायबर टॉवेल वापरा.
त्वचेचे अनेक प्रकार आहेत. त्वचा धुण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा. चुकीचा फेस वॉश निवडला तर त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून फेस वॉश निवडण्यासाठी किंवा तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी बनवलेले उत्पादने निवडण्यासाठी तज्ञांची मदत घ्या.
Skin Care – बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा
चेहरा धुतल्यानंतर त्वचेतील ओलावा नाहीसा होऊ लागतो. म्हणून चेहरा धुतल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर वापरा. चेहरा धुतल्यानंतर 1 ते 2 मिनिटांत मॉइश्चरायझर लावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List