हिंदुस्थान आपला मित्र, पण; 25 टक्के टॅरिफ लादल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? वाचा…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर, विशेषत: माहिती तंत्रज्ञान (IT), कापड, आणि फार्मास्युटिकल्स यांसारख्या क्षेत्रांवर मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दंडासह हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला आहे.
हिंदुस्थानवर टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “हिंदुस्थान हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेने कमी व्यावसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे, हिंदुस्थनांने त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य हे रशियाकडून खरेदी केले आहे, तसेच हिंदुस्थान रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार देश आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List