शेअर ट्रेडिंगमध्ये 40 लाखांची फसवणूक; गुजरातमधील चार आरोपींना अटक

शेअर ट्रेडिंगमध्ये 40 लाखांची फसवणूक; गुजरातमधील चार आरोपींना अटक

आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए-5 या व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची 40 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुजरात राज्यातील चार आरोपींना नगरच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

जावेदमाई मोहम्मदभाई सुमारा (वय 40, रा. काजली गाव, ता, वैरावल, जि. गीर सोमनाथ, गुजरात), जिग्नेश मोहनभाई कलसरिया (वय 27, रा. सनोसरी, ता. गिरगढडा, जि. गीर सोमनाथ, गुजरात), महादेव जसुभाई गेडीया (वय 30, रा. शांती विहार सोसायटी, पर्वत पटिया, सुरत, गुजरात) व रवि रामाजीभाई आजगिया (वय 36, रा. शिवदर्शन सोसायटी, कतार ग्राम, सूरत, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दखल करण्यात आली होती. 19 जून 2024 ते 11 जुलै 2024 या कालावधीत फिर्यादी यांना व्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिन अनिका शर्मा हिने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळतो, असे सांगून फसवणूक केली. या तक्रारीवरून गुन्हा दखल करण्यात आला.

फिर्यादी यांनी फसवणूक झालेल्या रकमांचे व्यवहार कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँकमधून केले होते. सायबर पोलिसांनी संबंधित बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषणात तपासणी केली असता, सदर बँक खाती जावेदभाई सुमारा व निहेश कलरिया यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. महादेव गेडीया व रवि आजगिया या दोघांनी जिग्नेश कलसरिया याला फसवणूक करण्यासाठी बँक खाते उघडण्यास मदत केल्याचे तपासात उघड झाले.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, उपनिरीक्षक सुदाम काकडे, अंमलदार अभिजीत अरकल, मोहम्मद शेख, अरुण सांगळे, गणेश पाटील, अप्पासाहेब टिंग, तसेच महिला अंमलदार सविता खताळ यांच्या पथकाने केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स