मोदी घाबरताहेत, ट्रम्प यांचं नाव घेतलं तर ते भंडाफोड करतील! राहुल गांधी यांचा हल्ला
ऑपरेशन ‘सिंदूर’ मीच थांबवल्याचा वारंवार दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत. ट्रम्पचे नाव घेतले तर ते भंडापह्ड करतील अशी भीती मोदींना वाटते, असा खोचक टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हाणला.
संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी कोणाचाही पह्न आला नव्हता असे मोदी काल लोकसभेत म्हणाले होते, मात्र त्यांनी ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. त्यावरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘मोदी थेट ट्रम्प यांना बोलू शकत नाहीत. कारण त्यांची अडचण आहे. ते बोलले तर ट्रम्प सगळे सत्य चव्हाटय़ावर मांडतील असे मोदींना वाटते, असे राहुल म्हणाले. ट्रम्प पुनः पुन्हा एकच गोष्ट बोलत आहेत त्यामागेही कारण आहे. व्यापार करारात ते हिंदुस्थानला दाबू पाहत आहेत. स्वतःच्या फायद्याचा करार ट्रम्पना हवा आहे. हा करार कसा होतो दिसेलच, असे सूचक विधान राहुल यांनी केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List