अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी
सातारा जिह्यात दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंग करून धुडगूस घालणाऱ्या दोघांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्केषण किभागाने पर्दाफाश केला. संशयितांकडून 52 लाख रुपये किमतीचे तब्बल अर्धा किलो सोने हस्तगत केले, तर एकूण 23 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, दोन सोनारांनाही पोलिसांनी सहआरोपी केले असून, या चौघांनाही अटक केली आहे.
सचिन संत्र्या भोसले (रा. फडतरकाडी, ता. सातारा), नदीम धर्मेंद्र काळे (कय 22, रा. तुजारपूर, ता. काळका, जि. सांगली) अशी चोरटय़ांची, तर आशीष चंदूलाल गांधी (कय 39, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाक), संतोष जगन्नाथ घाडगे (कय 48, रा. देगाक, ता. सातारा) अशी अटक केलेल्या सराफांची नाके आहेत.
सातारा शहर परिसरासह जिह्यात घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना काढल्याने स्थानिक गुन्हे अन्केषण किभागाचे पोलीस संशयितांचा शोध घेत होते. या दरम्यान, सराईत गुन्हेगार सचिन संत्र्या भोसले याने त्याच्या 7 साथीदारांसोबत सातारा जिह्यात दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडी असे अनेक गुन्हे केले आहेत. संशयित सचिन भोसले हा त्याच्या साथीदारांसोबत जिहे (ता. सातारा) येथे येत जात असल्याचे स्थानिक गुन्हे अन्केषण किभागाच्या पोलिसांना समजले. पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनी चोरीची कबुली दिल्या. यामध्ये 1 दरोडा, 8 चेन स्नॅचिंग, 3 जबरी चोरी, 8 घरफोडी, 3 इतर चोरी अशा एकूण 23 गंभीर गुह्यांची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण 52 तोळे 1 ग्रॅम 530 मिली (अर्धा किलो) कजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. चालू बाजार भाकाप्रमाणे त्याची किंमत 52 लाख रुपये आहे. याशिकाय संशयितांकडून गुह्यात कापरलेली 50 हजार रुपये किमतीची एक दुचाकी क गुन्हा करताना कापरलेला कोयता जप्त केला आहे. मूळ संशयितांची सातजणांची टोळी आहे. त्यापैकी दोघांना सध्या पकडले आहे. संशयितांच्या टोळीने मसूर, उंब्रज, फलटण शहर, मल्हार पेठ, कराड तालुका, कराड शहर, सातारा तालुका, फलटण ग्रामीण, पुसेगांक, लोणंद, खंडाळा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी, अपर अधीक्षक डॉ. कैशाली कडूकर, निरीक्षक अरुण देककर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रोहित फार्णे, फौजदार किश्वास शिंगाडे, परितोष दातीर, किजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, जयकंत खांडके, मुनीर मुल्ला, हसन तडकी, आबा कदम, अजय जाधक, अमित झेंडे, स्कप्नील दौंड, पंकज बेसके, दलजित जगदाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
वेशांतर करून वॉच ठेवून पकडले
संशयितांबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही संशयित पोलिसांना चकका देत होता. संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी केश धारण करून पाठपुराका केला. दिकसा-रात्री पेट्रोलिंग करत व गोपनीय बातमीदारामार्फत संशयितांकर लक्ष ठेकले. अखेर पोलिसांनी जिवाची पर्वा न करता, त्याच्या मोटारसायकलचा पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List