Judge Cash Row – न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर राज्यसभेत महाभियोगाची प्रक्रिया चालणार नाही!

Judge Cash Row – न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर राज्यसभेत महाभियोगाची प्रक्रिया चालणार नाही!

निवासस्थानी कोट्यवधी रकमेचे घबाड सापडल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग प्रक्रिया प्रथम लोकसभेत सुरू होईल. तसेच तत्कालीन सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारलेली राज्यसभेतील महाभियोग प्रस्तावाची नोटीस रद्द केली जाईल, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग; सरन्यायाधीशांची केंद्र सरकारला शिफारस

सरकार स्वतः लोकसभेत महाभियोग प्रस्ताव सादर करेल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. ठोस पुरावे आढळले तर त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची शिफारस केली जाऊ शकते, असे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

यशवंत वर्मा अलाहाबाद हायकोर्टातही नकोच! वकिलांनी घेतली सरन्यायाधीशांची भेट

राज्यसभेत विरोधकांनी महाभियोग प्रस्तावाची नोटीस दिली आणि सभापती जगदीप धनखड यांनीही तो प्रस्ताव स्वीकारला होता. आता तो रद्द करण्यात येणार आहे. कारण तो सभागृहात औपचारिकपणे सादर केला गेलाच नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक
बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने...
फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करतात; संजय राऊत यांचा घणाघात
डान्सबार चालवणारे मंत्री कॅबिनेटमध्ये घेता आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत नैतिकतेच्या गप्पा मारता, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा