राज्यातील संवैधानिक गोंधळ थांबवावा; सरन्याधीशांना दिलेल्या पत्राबाबत आदित्य ठाकरे यांची माहिती

राज्यातील संवैधानिक गोंधळ थांबवावा; सरन्याधीशांना दिलेल्या पत्राबाबत आदित्य ठाकरे यांची माहिती

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या वतीने विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षांकडून त्यांना विधीमंडळाबाबतची माहिती देण्यात आली. विधीमंडळात विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यात येत आहे. अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. तसेच राज्यात सुरू असलेल्या संवैधानिक गोंधळाबाबतचे निवेदन सरन्यायाधीश भूषण गवई यांना देण्यात आले. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या वतीने विधीमंडळात सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. त्यावेळी आम्ही सरन्यायाधीशांना महाराष्ट्राच्या विधीमंडळात काय सुरू आहे, याबाबतची माहिती दिली. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यात येत आहे. विरोधी पक्षनेत्याशिवाय राज्यात चौथे अधिवेशन होत आहे. निवडणुका होऊन सत्ता स्थापन झाल्यानंतरही आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केली नसल्याबाबतची माहिती आम्ही सरन्यायाधीशांना दिली आहे.

विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. देशात अल्पमतातील सरकारे स्थापन झाली आहेत. दोन आमदार, खासदार असतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले आहेत. आघाडी, युतीची सरकारे स्थापन झाली आहेत. राज्यात विधानसभेत 175 ते 200 आमदार सत्ताधारी बाकावर असतानाही सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षांची भीती वाटत आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांची एवढी भीती वाटते की, ते विरोधी पक्षनेतेपद देऊ शकत नाही. याबाबतचे निवेदनाचे पत्रही आम्ही सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही त्यांना देण्यात आले आहे. राज्यात संवैधानिक गडबड, गोंधळ झाला आहे. चार पक्ष दोन पक्षांच्या नावाने आहेत. आता ही गडबड थांबवण्याची गरज आहे. ही राजकीय, सामाजिक, संवैधानिक अडचण झाली आहे, ती निस्तरणे गरजेचे आहे, अशी विनंतीही आम्ही सरन्यायाधीशांना केली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माझ्याच घरात माझा छळ होत आहे, खूप उशीर होण्यापूर्वी कोणीतरी मला मदत करा! अभिनेत्री तनुश्री दत्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल माझ्याच घरात माझा छळ होत आहे, खूप उशीर होण्यापूर्वी कोणीतरी मला मदत करा! अभिनेत्री तनुश्री दत्ताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आणि रडत रडत मदतीची याचना केली. अभिनेत्रीने म्हटले आहे की, गेल्या 4-5...
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण पोलिसांना शरण, तत्काळ जामीन मंजूर
नालासोपाऱ्यात ‘दृश्यम’… प्रियकराच्या मदतीने पत्नीने हत्या करून पतीला पुरले, नव्या टाइल्सने उकरला घरात गाडलेला मृतदेह
वसईत दोन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा डाव फसला; बोगस तृतीयपंथियांना नागरिकांनी चोपले
Bhandup Landslide – भांडुपच्या खिंडीपाडा भागात दरड कोसळली, पाच घरांचे नुकसान
Health Tips – पायात चांदीचे पैंजण घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे
महडमधील हजारो गणेशभक्तांची लूट थांबली, शिवसेनेच्या दणक्यानंतर मंदिर देवस्थानचा यू टर्न