दोन मिनिटांत 1 हजार कोटी कमावले, शेअरमुळे मालकासह गुंतवणूकदारही मालामाल
मुंबई शेअर बाजारात आज इतिहास घडला. इटरनल लिमिटेडच्या झोमॅटोच्या शेअर्सने मालकासह गुंतवणूकदारही मालामाल झाले. तब्बल 1 हजार कोटींची कमाई झाली. कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत वाढलवे आणि 319.60 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. यामुळे सीईओ आणि संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या संपत्तीत दोन मिनिटांत 1 हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. यात गुंतवणूकदारांचाही फायदा झाला.
जून महिन्याच्या तिमाहीच्या अखेरीस गोयल यांचा इटरनलमध्ये 3.83 टक्के हिस्सा होता. सोमवारी त्यांच्या हिस्स्याचे अंदाजे मूल्य 10 हजार 024 कोटी रुपयांहून 1 हजार 1 कोटी रुपयांनी वाढले आणि ते 11,025 कोटी रुपयांवर पोहोचले. पहिल्या तिमाहीत अचानक झालेल्या वाढींतर गेल्या सत्रात इटरनल शेअर्समध्ये 5.64 टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत अब्जाधीश दीपिंदर गोयल यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.
शेअर बाजार 13 टक्क्यांनी घसरला
आज आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. तेल, वायू आणि आयटी कंपन्यांचे समभाग घसरले. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 12.53 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 82,186.81 वर बंद झाला. खरेदीविक्रीदरम्यान तो 337.83 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी वाडून 82,538.17 वर पोहोचला होता. मात्र नंतर त्याची गती मंदावली. तर 50 शेअर्सचा एनएसई निफ्टी 29.80 अंकांनी किंवा 0.12 टक्क्यांनी घसरून 25,060.90 वर बंद झाला.
इटरनल कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 25 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला. कंपनीच्या नफ्यात प्रामुख्याने वाढत्या खर्चामुळे घट झाल्याचे पहायला मिळाले. ही कंपनी झोमॅटो आणि ब्लिंकिट ब्रँड चालवते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List