ऑनलाईन जुगारात पैसे हरला अन् पोलिसच चोर बनला, कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरल्या

ऑनलाईन जुगारात पैसे हरला अन् पोलिसच चोर बनला, कर्ज फेडण्यासाठी दुचाकी चोरल्या

बीडमध्ये धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. बीड जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारीच चोर असल्याचं समोर आलं आहे. अमित मधुकर सुतार असं या कर्मचार्‍याचे नाव आहे. हा कर्मचारी ऑनलाईन जुगार ड्रीम 11 आणि रम्मी अ‍ॅपसारख्या गेमध्ये पैसे गमावून बसला. काढलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क चोरीचा मार्ग स्विकारला. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुतार याने बॅटर्‍याही चोरल्या होत्या.

ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानंतर काढलेले कर्ज फेडण्यासाठी अमित सुतार याने चोरीचा मार्ग पत्करला. पोलीस अधीक्षक कार्यालयातून इनर्व्हटरसाठी लागणार्‍या तब्बल 58 बॅटर्‍या चोरल्या होत्या. या प्रकरणानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी सुतार याचे निलंबन केले होते. तेव्हापासून तो जामिनावर बाहेर होता. या प्रकरणाला वर्ष उलटत नाही तोच सुतार याने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने सात दुचाकी चोरी केल्या. चोरीच्या या प्रकरणात अमित सुतार याच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ताब्यातही घेण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;