दत्ताजी नलावडे यांनी वरळीत उभारलेल्या शिवालयासाठी एक कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा
शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवामुक्ती संग्राम या दोन्ही चळवळींमध्ये दत्ताजी नलावडे यांचे योगदान मोठे आहे. दत्ताजी नलावडे यांनी बांधलेली शिवालय ही इमारत मुंबईच्या अभिमानाचे स्थान आहे. त्यामुळे वरळी येथील शिवालय या लोक सेवा पेंद्राला राज्य सरकारकडून एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी विधान परिषदेत केली.
शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात शिवालय नावाचे लोकसेवा पेंद्र सुरू केले होते. सध्या या पेंद्राची इमारत जीर्ण झाल्यामुळे मुंबई महापालिकेकडून या पेंद्राचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर यांचा विकासनिधीही या कामासाठी देण्यात आलेला आहे. पेंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी माहिती विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाला दिली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेतर्फे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सदस्यांनी याव्यतिरिक्त अन्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरकारकडे केली असता सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी सरकारकडून 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सरकारकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे आणि सभागृहाचे काwतुक करतो, अशी भावना शिवसेना आमदार अनिल परब यांनी व्यक्त केली.
संयुक्त महाराष्ट्र, गोवामुक्ती संग्रामात मोठे योगदान
शिवसेना नेते दत्ताजी नलावडे हे नगरसेवक आणि महापौरदेखील होते. मुंबईकर, गिरणगावकरांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे महान व्यक्तिमत्त्व होते. इतकेच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवामुक्ती संग्राम या दोन्ही चळवळींमध्ये दत्ताजी नलावडे यांचे योगदान मोठे आहे. कामगार, क्रीडा, साहित्य, कला या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे, असे आशीष शेलार म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List