शौचालयात भ्रष्टाचार! अश्विनी जोशी यांची चौकशी, 1 महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश

शौचालयात भ्रष्टाचार! अश्विनी जोशी यांची चौकशी, 1 महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश

मुंबईत एक कोटी 65 लाख रुपयांच्या एका शौचालयाचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या सात आकांक्षी शौचालयांच्या (ऑस्पिरेशनल टॉयलेट) बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. अखेर याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांच्या चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. पालिका आयुक्तांच्या पातळीवर अतिरिक्त आयुक्तांची येत्या तीस दिवसांत चौकशी करावी. शौचालयाचे नियमबाह्य काम झाल्याचे सिद्ध झाले तर सरकारने योग्य कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.

मुंबईतील आकांक्षी शौचालयांच्या बांधकामाबाबत  भाजप आमदार अमित साटम यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती.  या प्रकल्पांतर्गत 14 शौचालयांसाठी 20 कोटींची निविदा मंजूर झाली असून  ‘ए’ वॉर्डमधील पाच ठिकाणी कामही सुरू झाले आहे. एका शौचालयासाठी सव्वा कोटी ते पावणेदोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. अशी कोणत्या पद्धतीची शौचायले बांधली जात आहेत?  ही शौचालये  सार्वजनिक फुटपाथांवर उभारली  जात असून महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ धोरणाचा स्पष्ट भंग आहे. ही केवळ शौचालये नसून अतिक्रमण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीने यास विरोध दर्शवला होता. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. या शौचालयांसाठी इतका मोठा खर्च का केला जात आहे? या प्रकल्पामागे कोणाचे हितसंबंध आहेत का याची चौकशी व्हावी आणि ती 30 दिवसांत पूर्ण करावी. तोपर्यंत सर्व कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नाला उत्तर देताना  मंत्री उदय सामंत यांनी  या प्रकल्पाची चौकशी करण्याचे जाहीर केले.

वांद्रे भागात फुटपाथवर अतिक्रमण

या चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे विभागात फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांकडे लक्ष वेधले. म्हाडामार्फत या भागात फुटपाथवर बांधलेल्या शेड पूर्णपणे बेकायदा असल्याचे सांगितले. फुटपाथवर लागलेल्या होर्डिंगमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. या होर्डिंगवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही कारवाई झालेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर फुटपाथवरील होर्डिंग हटवण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सर्व कामांना स्थगिती

ही चौकशी 30 दिवसांत पूर्ण होईल. या प्रकल्पात महापालिकेने स्वतःच्या धोरणाचे उल्लंघन केले का याचीही चौकशीत होईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व चालू काम थांबवले जाईल. चौकशीत  नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वच्छता अभियानात कराड देशात दुसरे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण स्वच्छता अभियानात कराड देशात दुसरे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
स्वच्छतेच्या अभियानात सातत्याने उच्च दर्जाची कामगिरी बजावणाऱया कराड नगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये देशात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 50...
शाळांतील सीसीटीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, अधिकाऱ्यांना चौकशीचा मुहूर्त मिळेना
दिल्लीनंतर आता बंगळुरूमधील 40 शाळांना बॉम्बच्या धमक्या, तपास सुरु
कालच्या प्रकाराने संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली – विजय वडेट्टीवार
Juice Benefits – ‘हा’ ज्यूस आहे अनेक रोगांवर गुणकारी, वाचा
विधानभवनात गँगवॉर; महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा! संजय राऊत आक्रमक, टीम फडणवीसच्या चौकशीची मागणी
शनी मंदिराच्या विश्वस्तांना नोटिसा; आज सुनावणी