श्रीवर्धन एसटी आगाराचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, नटबोल्ट निखळले; मुंबई-श्रीवर्धन लालपरीचा रामभरोसे प्रवास

श्रीवर्धन एसटी आगाराचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, नटबोल्ट निखळले; मुंबई-श्रीवर्धन लालपरीचा रामभरोसे प्रवास

श्रीवर्धन आगाराने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू केला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथून प्रवाशांना घेऊन सकाळी सहा वाजता सुटलेली (क्र.एम एच-13 सी यू 6896) मुंबई-नानवली-श्रीवर्धन या गाडीच्या मागील दोन चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे उजव्या बाजूच्या चाकाचे आठपैकी तब्बल पाच नट निखळलेले होते. उर्वरित तीन नटही ढिले असतानासुद्धा या गाडीने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनपर्यंत प्रवास केला आहे. सुदैवाने कोणताही अपघात झाला नसला तरी या रामभरोसे कारभाराने चाकरमान्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

मुंबई सेंट्रल येथून मुंबई-नानवली-श्रीवर्धन ही एसटी बस सुटते. या लालपरीने दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मात्र श्रीवर्धन आगारातील भंगार गाड्यांमुळे दिवसेंदिवस हा प्रवास धोकादायक होऊ लागला आहे. २८ जून रोजी सकाळी सहा वाजता खचाखच भरलेल्या प्रवाशांना घेऊन मुंबई-नानवली-श्रीवर्धन ही बस रायगडच्या दिशेने निघाली होती. मात्र या गाडीच्या मागील दोन चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे उजव्या बाजूच्या चाकाचे आठपैकी पाच नट निखळलेले होते. उर्वरित तीन नट केव्हाही पडतील अशी अवस्था होती. मात्र असे असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनपर्यंत गाडी आणण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;