ऑफिसला या, नाही तर राजीनामा द्या! अ‍ॅमेझॉनने सोडले साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना फर्मान

ऑफिसला या, नाही तर राजीनामा द्या! अ‍ॅमेझॉनने सोडले साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना फर्मान

जगभरातील टेक कंपन्यांनी सुरू केलेल्या कर्मचारी कपातीमुळे नोकरी जाण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेली असताना अ‍ॅमेझॉन कंपनीने काढलेल्या एका नव्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अ‍ॅमेझॉनने जगभरातील साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. जे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत त्यांनी तत्काळ कार्यालयात येऊन काम करावे. अन्यथा राजीनामा देऊन मोकळे व्हावे. अ‍ॅमेझॉनच्या या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे सिएटल, आर्लिंग्टन (व्हर्जिनिया), वॉशिंग्टन डीसी, यासारख्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करावे, असे कंपनीने बजावले आहे. बऱ्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करणे शक्य नाही. त्यामुळे बरेच कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. जे कर्मचारी कार्यालयात येणार नाही त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी जर राजीनामा दिला तर त्यांना कोणत्याही प्रकारचा पगार अतिरिक्त दिला जाणार नाही.

अ‍ॅमेझॉनचा हा निर्णय ‘रिटर्न टू ऑफिस’ या धोरणाचा एक भाग आहे. कर्मचारी जर कार्यालयात येऊन काम करत असेल तर सहकार्य, इनोव्हेशन आणि उत्पादन वाढते. वर्क फ्रॉम होममुळे हे सर्व कमी झाले होते, असे कंपनीचे म्हणणे आहे. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्ये पडसाद उमटले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;