चक्क पैसे दिसत असताना कपड्यांची बॅग म्हणता? अंजली दमानिया यांचं शिरसाटांना आव्हान

चक्क पैसे दिसत असताना कपड्यांची बॅग म्हणता? अंजली दमानिया यांचं शिरसाटांना आव्हान

मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅगेत कपडे असल्याचं संजय शिरसाटांनी यांनी म्हटलं आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत शिरसाट यांना सुनावलं आहे. चक्क पैसे दिसत असताना कपड्याची बॅग असेल असं कसं म्हणू शकतात? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.

अंजली दमानिया यांनी ट्विटरवर (X) एक व्हिडीओ पोस्ट करत संजय शिरसाटांना आव्हान दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ” मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात? मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे. “हा माझ्या घरचा व्हिडीओ आहे” असे ते म्हणत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल आणि ते खरं बोलत असतील तर, आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे की, जी रूम व्हिडीओमध्ये दिसत आहे ती खरंच त्यांच्या घरची आहे”, असं अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच कोणाच्याही बेडरूममध्ये CCTV लावणं अतियश चुकीचं आहे, असंही दमानिया म्हणाल्या.

Maharashtra Monsoon Session 2025 – मंगळसूत्र चोराचा… मंगळसूत्र चोराचा..! जितेंद्र आव्हाडांनी घोषणा देत गोपीचंद पडळकरांना डिवचलं

संजय राऊत यांनी ट्विटरवर (X) एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसत आहे. मात्र, संजय शिरसाटांनी व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅगमध्ये कपडे असल्याचं म्हटलं आहे.

50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुमची झोप पण वारंवार मोडत असेल, तर बेडरूममध्ये करा हे 7 बदल; आठवडाभरातच जाणवेल फरक जर तुमची झोप पण वारंवार मोडत असेल, तर बेडरूममध्ये करा हे 7 बदल; आठवडाभरातच जाणवेल फरक
झोप आपल्या सर्वांना प्रिय असते. ती जर पूर्ण झाली तर आपल्या शरीराचा थकवा कमी होण्यास मदत होते. पण काही वेळेला...
कापलेली फळे किती वेळात खाणे सुरक्षित मानले जाते? जाणून घ्या अन्यथा होऊ शकते विषबाधा
ईडी लावली तर मी सीडी लावणार, त्या सीडीचे काय झाले? एकनाथ खडसेंनी दिली मोठी माहिती
IND vs ENG 4th Test – …तर जसप्रीत बुमरा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल! टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं भाकीत
झारखंडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा, एके-47 आणि इन्सास रायफल जप्त
बिहारमध्ये NDA मध्ये जुंपली, अशा सरकारला पाठिंबा दिल्याचे दुःख; चिराग पासवान यांचा नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल
चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शनिदेवाची आठवण येते; रोहित पवार यांचा कोकाटेंना टोला