अल्कराझचा झंझावात कायम, आता उपांत्य फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी गाठ

अल्कराझचा झंझावात कायम, आता उपांत्य फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी गाठ

विम्बल्डनच्या हिरवळीवरील जेतेपदाची हॅटट्रिक स्पॅनिश कार्लोस अल्कराझपासून दोन पावले दूर आहे. त्याने आज पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत  ब्रिटनच्या पॅमरुन नोरीचा 6-2, 6-3, 6-3 असा अवघ्या 99 मिनीटांत फडशा पाडला.  आता त्याची गाठ अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झशी पडेल. फ्रिट्झने शानदार खेळ दाखवत उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत  रशियाच्या 17व्या मानांकित करेन खाचानोव्हचा 6-3, 6-4, 1-6, 7-6(4) असा पराभव केला. त्याने प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.

आज पुरुष एकेरीच्या पहिल्या दोन्ही लढती एकतर्फी झाल्या. अल्कराझच्या झंझावातापुढे पॅमरून नोरीचे काहीएक चालले नाही. एकाही सेटमध्ये नोरी अल्कराझला झुंज देऊ शकला नाही. त्यामुळे सामना 1 तास 39 मिनीटांत आटोपला. दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात सुरुवातीची दोन सेट्स सहज जिंकल्यानंतर तिसर्या सेटमध्ये फ्रिट्झला हार पत्करावी लागली. मात्र चौथ्या सेटमध्ये दोघांमध्ये चुरस झाली आणि टायब्रेकमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना फ्रिट्झने शेवटी निर्णायक खेळी करत सामना जिंकला. जगातील पाचव्या क्रमांकाच्या या खेळाडूने यंदा पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;