तुझ्या घोड्यासहीत तुला अटक करू, पोलिसांनी शिवरायांच्या वेषात आलेल्या मुलाला धमकावले
मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा दडपण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. मात्र तरिही मोर्चा ठिकाणी जमलेल्या हजारो मराठीप्रेमी,शिवसेना मनसे कार्यकर्ते हे मोर्चा काढण्यावर ठाम होते. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ओमकार भारत करचे हा अकरा वर्षांचा मुलगा मोर्चाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र या मुलाने आपण मोर्चात सहभागी होणारच असा ठाम निर्धार प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला.
”पोलीस मला म्हणाले की इथून निघून जा नाहीतर तुला व तुझ्या घोड्याला अटक करू. पण मी मोर्चात सहभागी व्हायला आलो होतो. मी अजुनही आंदोलनावर ठाम आहे. मराठी सर्वांना आलीच पाहिजे, असे ओमकारने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List