Skin Care – पार्लरमध्ये न जाता घरबसल्या करा फळांचे फेशियल, वाचा

Skin Care – पार्लरमध्ये न जाता घरबसल्या करा फळांचे फेशियल, वाचा

आपल्या निरोगी आरोग्यासाठी फळे खाणे हे खूप गरजेचे आहे. फळांमुळे आपल्या आरोग्यावर हितावह परीणाम होतात. शिवाय फळे ही आपल्या त्वचेसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जातात. म्हणूनच तर सध्याच्या घडीला नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन पार्लरमध्ये फेशियल करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये फळांपासून ते अगदी भाताच्या पाण्यापर्यंत अनेक गोष्टी सध्या फेशियलसाठी वापरल्या जात आहेत.

पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरीच फळांचे फेशियल केल्यास, आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडेल. आपण घरी असलेल्या कोणत्या फळांपासून फ्रूट फेशियल करु शकतो हे जाणून घेऊया.

Skin Care – चेहरा सुंदर दिसण्यासाठी कच्चे दूध वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

फ्रुट फेशियल म्हणजे काय?

फळांमध्ये असलेले अनेक घटक हे त्वचेसाठी खूपच आवश्यक असतात. फेशियल करताना त्वचेवर होणारा मसाज यामधून फळांचे गुण हे आपल्या त्वचेसाठी पोषक ठरतात.

Skin Care- सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे फायदे

डाळिंब– आपल्या त्वचेसाठी डाळिंबाचा रस हा खूप उपयोगी मानला जातो. डाळिंबाच्या रसामुळे त्वचेवरील पिंपल्स नाहीसे होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर चमक येण्यासाठी सुद्धा उपयोग होतो.

पपई – पपई ही आपल्या आरोग्यासाठी जितकी महत्त्वाची तितकीच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर मानली जाते. वास्तविक पपई ही एक उत्तम ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. मृत पेशी काढून नवीन आणि निरोगी पेशी तयार करण्यात मदत करू शकते. या प्रक्रियेमुळे त्वचेच्या रंगात बरीच सुधारणा दिसून येते.

 

केळी – त्वचेसाठी केळी हे एक नैसर्गिक चमक देण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. केळ्यामध्ये त्वचा एक्सफोलिएट करण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे त्वचेच्या मृत पेशींना एक्सफोलिएट करण्यात मदत होते. तसेच फेसपॅक म्हणून केळीचा वापर केल्यास टॅनिंगची समस्या कमी होऊ शकते. एवढेच नाही तर, केळ्यामध्ये मुरुमविरोधी आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील समृद्ध असतात, ज्यामुळे मुरुम आणि सुरकुत्याची समस्या कमी होते.

Skin Care- चेहरा सुंदर आणि टवटवीत होण्यासाठी बीट आहे बहुमोली

संत्री – संत्रे खाण्यासोबतच त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जातात. संत्र्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे संत्र्याचा वापर हा नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. संत्रे त्वचेवर लावल्यास झटपट चमक येण्यास मदत होते. तसेच, मुरुमांची समस्या आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बागेश्वर धाममध्ये मंडप कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, 4 जण जखमी बागेश्वर धाममध्ये मंडप कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, 4 जण जखमी
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध बागेश्वर धाम गढा संकुलात गुरुवारी सकाळी मंडप कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये मंडप कोसळल्याने एका...
परप्रांतीय मजुरांनी केला कीर्तनकार महिलेचा खून, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या
Video – कोल्हापुरात रस्त्याअभावी वयोवृद्ध रुग्ण, गरोदर मातांची हेळसांड ; पाठीवर आणि बैलगाडीतून रुग्णांना नेण्याची वेळ
Diogo Jota – लिव्हरपूलच्या स्टार फुटबॉलपटूचा भीषण कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न
Pune Crime – इन्स्टाग्रामवरून ओळख, मग अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोघांवर गुन्हा दाखल
एक ब्लॉकबस्टर सिनेमा अन् 3 सुपरस्टार; गेल्या चार वर्षात तिघांनीही घेतला जगाचा निरोप
Vasai Churchgate Local – लोकलमध्ये पुन्हा राडा; आता तर पोलिसाचाच दात तोडला, एकाला अटक