भाजपच्या राज्यात हे काय चाललंय? मरणाचं ट्रॅफिक; इंदूरमध्ये वाहतूककोंडीमुळे तिघांचा मृत्यू

भाजपच्या राज्यात हे काय चाललंय? मरणाचं ट्रॅफिक; इंदूरमध्ये वाहतूककोंडीमुळे तिघांचा मृत्यू

वाहतूककोंडीमुळे एखाद्या ठिकाणी जायला उशीर झाला तर ‘मरणाचं ट्रफिक होतं’ असे आपल्याकडे सहज म्हणतात. पण सहज उच्चारला जाणारा हा शब्द इंदूरमध्ये दुर्दैवाने खरा ठरला आहे. इंदूरमध्ये एका मार्गावर तब्बल 32 तास झालेल्या वाहतूककोंडीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यात हे काय चाललंय, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.

सहा पदरी पूल बांधणी, अर्धवट बांधकाम झालेला सर्व्हिस रोड आणि वाहतूक वळविण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्यामुळे ही कोंडी झाली. त्यात पाऊस आणि रस्त्यावरील खड्डय़ांची भर पडली. त्यामुळे गुरुवारी दुपारी लागलेले हे ट्रफिक शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम होते. ही वाहतूककोंडी फुटण्यासाठी तब्बल 32 तास लागले. तोपर्यंत या मार्गावर गाडय़ांची रांग 8 किलोमीटरपर्यंत गेली होती. या कोंडीत अडकल्यामुळे प्रकृती बिघडून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मार्गावरील अनेक गाडय़ा पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात आल्या.

दोन्ही ऑक्सिजन सिलिंडर संपले!

मृत्यू झालेल्यांमध्ये 65 वर्षांचा एक शेतकरी होता. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कसेबसे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. बलराम पटेल हे 55 वर्षीय कॅन्सर रुग्ण रुग्णालयात जात होते. मात्र हा रुग्ण ज्या दोन ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होता, ते संपल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर 32 वर्षांच्या तरुण सुरक्षा रक्षकाला छातीत वेदना होऊ लागल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल कॉफी तयार करताना झुरळे देखील कुस्करली जातात? FDA ने सांगितलेलं सत्य जाणून घेतल्यास धक्का बसेल
चहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात....
तुम्ही पण बाळाच्या पायात काळा धागा बांधता? थांबा चूक करताय, बाळाला होऊ शकतो हा धोका
शेअर बाजारातील घसरण थांबणार कधी? अनिश्चततेने गुंतवणूकदार धास्तावले
Skin Care – ‘या’ डाळीच्या वापराने चेहऱ्यावरील मुरूम होतील चटकन दूर, वाचा
‘लाडकी बहीण’साठी आता हॉटेल मालकांच्या पैशांवर डल्ला; ठाणे हॉटेल असोसिएशनकडून हॉटेल बंद
Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा
समृद्धी टोल नाक्यावर लुटीची धक्कादायक घटना उघड; अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसांच्या मुलाला लुटले, 82 हजारांची रोकड लांबवली