दानशूर! 51 हजार 300 कोटी रुपये दान, वॉरेन बफे यांच्याकडून मोठी घोषणा

दानशूर! 51 हजार 300 कोटी रुपये दान, वॉरेन बफे यांच्याकडून मोठी घोषणा

बर्कशायर हॅथवेचे सीईओ आणि गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीतील मोठा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 94 वर्षीय बफे यांनी शनिवारी ही घोषणा केली आहे. ते आपल्या संपत्तीतील 6 अब्ज डॉलर किंमतीचे बर्कशायर हॅथवेचे शेअर पाच फाऊंडेशनला दान करतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत तब्बल 51 हजार 300 कोटी रुपये इतकी आहे. हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे वार्षिक दान आहे. ज्या पाच फाऊंडेशनला हे दान करण्यात आले आहे त्यात गेट्स फाऊंडेशन आणि त्यांच्या कुटुंबातील चार धर्मादाय संस्थांचा समावेश आहे.

बफे यांनी गेट्स फाऊंडेशनला 94.3 लाख शेअर्स आणि सुसान थॉम्पसन बफेट फाऊंडेशनला 43,384 शेअर्स दान केले आहेत. तसेच त्यांच्या तीन मुलांच्या फाऊंडेशनला 19,81,098 शेअर्स दान केले आहेत. यामध्ये हावर्डच्या जी. हॉवर्ड फाऊंडेशनला 6,60,366 शेअर्स, सुसीच्या शेअरवुड फाऊंडेशनला 6,60,366 शेअर्स, पीटर्सच्या नोव्हो फाऊंडेशनला 6,60,366 शेअर्स दान केले आहेत. 2025 च्या अखेरपर्यंत बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद ते सोडतील, अशी घोषणा बफे यांनी केली होती. तसेच बर्कशायरचा एकही शेअर्स विकणार नाही. हे शेअर्स हळूहळू दान करत राहू असेही म्हटले होते.

दोन दशकांत 5.13 लाख कोटी दान

वॉरेन बफे हे 2006 पासून दान करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 5.13 लाख कोटी रुपये दान केले आहेत. बफे हे अजूनही बर्कशायरच्या 13.8 टक्के शेअर्सचे मालक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी त्यांचे मृत्युपत्र बदलले आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीपैकी 99.5 टक्के रक्कम एका चॅरिटेबल ट्रस्टला देण्याचा निर्णय घेतला, ज्याची काळजी त्यांची मुले घेणार आहेत.

‘अ‍ॅपल’मधील अर्धा हिस्सा विकला

बफे यांची कंपनी बर्कशायल हॅथवे इंकने वर्षभरापूर्वी अ‍ॅपलमधील 50 टक्के हिस्सा विकून टाकला आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत बर्कशायरची अ‍ॅपलमधील गुंतवणूक आता 84.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 7.05 लाख कोटी रुपये इतकी राहिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;