थकलो असलो तरी आजही आमची शिवसेनेवर निष्ठा; शिवसेना भवनात जमला जुन्या शिवसैनिकांचा मेळा

थकलो असलो तरी आजही आमची शिवसेनेवर निष्ठा; शिवसेना भवनात जमला जुन्या शिवसैनिकांचा मेळा

जून 1985 पासूनचा शिवसेना संघटनेच्या बांधणीसाठी केलेला संघर्ष, अडीअडचणींचा सामना करताना निष्ठेची शिदोरी घेऊन काम करीत ‘शिवसेना झिंदाबाद’चा जयघोष करीत आजपर्यंत जगलो. आज प्रवाहात नसलो तरी आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर असलेली आमची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही, यापुढेही होणार नाही, असा शब्द 40 वर्षांनंतर संभाजीपेठेतील शिवसेना भवनमध्ये आयोजित मेळाव्यात ज्येष्ठ शिवसैनिकांनीशिवसेना नेत्यांना दिला.

या मेळाव्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, प्रदीपकुमार खोपडे, महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्यासह रमेश सुपेकर, माजी सभापती अविनाश कुमावत, माजी नगरसेवक प्रदीप दत्त, सुभाष परदेशी, अशोक बावस्कर, सदानंद शेळके, देशमुख, दिलीप घाट, श्रीरंग मनोहर माचवे, मुक्तेश्वर खंडू खंडागळे, नानासाहेब पळसकर, बाबुराव भोसले, ज्ञानेश्वर मडकर, मच्छिद्र हाडे, कचरू नारायण मातकर, दत्तात्रय दारुंटे, विजयकुमार हिवाळे, प्रवीण जाधव, गिरीश चपळगावकर, उद्धव सोपान थोरात, शंकरराव रोठे, विठ्ठल बदर पाटील, रघुनाथ चव्हाण, भानुदास पिंपळे, संजय भागिनाथ दवंगे, भीमसिंह राजपूत, सुभाष टाकळकर, कारभारी पाटील जाधव, प्रभाकर जोशी, प्रेम पाटील, साईनाथ महाडिक, चंद्रकला चव्हाण, मालती भोसले, राधाकृष्ण भालेकर, काकासाहेब पुंड, रुस्तुम चिमणे, सुधीर बाहेकर, गोरखनाथ खडके, विजय भावले, सोमीनाथ राठोड, तोताराम पवार, सतीश दुबे, अनिल पाटेकर, सदाशिव राऊत, छगन सवंगडे, सुभाष पवार, सचिन खैरे, किरण गणोरे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रमेश सुपेकर यांनी केले.

जुन्या शिवसैनिकांची विचारपूस करा : मिर्लेकर

तुमच्या त्यागावर शिवसेना उभी आहे. त्यांची विचारपूस करा, त्यांना मानसिक बळ द्या, असे आवाहन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले. जुने शिवसैनिक निष्ठावंत असून ते आज शेलारमामाच्या भूमिकेत आहेत. या शेलारमामांना जपले पाहिजे. ज्यांच्यामध्ये अजूनही काम करण्याची उमेद असेल तर त्यांना बोलवा, त्यांचे मार्गदर्शन घ्या, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघटना उभी केली, आज त्यांच्या पाठीशी रहा, असेही मिर्लेकर म्हणाले. जुने शिवसैनिक जे की व्होटर्स राहिलेले आहेत. यापुढील निवडणुकीतही ते व्होटर्सची भूमिका पार पाडतील, असे महानगरप्रमुख राजू वैद्य म्हणाले.

ज्यांनी मला मोठे केले त्यांना कधीही विसरणार नाही : खैरे

जुन्या, निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरच शिवसेना उभी आहे. त्यांच्या ताकदीचा मला नेहमीच फायदा झालेला आहे. त्यांच्या निष्ठेमुळे, कामामुळेच मी आतापर्यंत निवडून आलेलो आहे. ज्यांनी मला मोठे केले त्यांना आणि शिवसेनेला मी कधीही विसरणार नाही, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मी आजही जुन्या शिवसैनिकांना विसरलेलो नाही. मला सर्व जाणीव आहे. सर्वांच्या सुख-दुःखात गेले पाहिजे. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांना विसरू नका, असेही खैरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;