Uttarakhand landslide – उत्तरकाशीत ढगफुटीनंतर भूस्खलन; 9 कामगार बेपत्ता, यमुनोत्री मार्ग वाहून गेला

Uttarakhand landslide – उत्तरकाशीत ढगफुटीनंतर भूस्खलन; 9 कामगार बेपत्ता, यमुनोत्री मार्ग वाहून गेला

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चार धाम यात्राही 24 तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. अशातच उत्तरकाशीतून एक मोठी बातमी समोर आली असून ढगफुटीनंतर 9 कामगार बेपत्ता झाले आहेत. उत्तरकाशीच्या सिलाई बंद येथे बारकोट-यमुनोत्री मार्गावर सुरू असलेल्या हॉटेल कामासाठी हे कामगार येथे आले होते

मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलजवळ भूस्खलन झाले आणि येथे राहणारे 8 ते 9 कामगार बेपत्ता झाले. याची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव व शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य यांनी दिली. तसेच याचा यमुनोत्री मार्गावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी सकाळच्या सुमारास भूस्खलनाची ही घटना घडली. आतापर्यंत 10 कामगारांना वाचवण्यात आले असून 9 जण अद्यापही बेपत्ता आहे. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. भूस्खलनामुळे यमुनोत्री महामार्गाचा 10-12 मीटर भागही वाहून गेला आहे. सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस मदत, बचाव व शोध मोहिमेत गुंतलेले आहेत, अशी माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिली.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेबाबत ट्विट करत माहिती दिली. उत्तरकाशीच्या बडकोट तालुक्यातील सिलाई बंद भागात भूस्खलन होऊन काही कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असे ट्विट धामी यांनी केले.

दरम्यान, हवामान विभागाने रविवार आणि सोमवारसाठी उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होत पुढील 24 तासांसाठी चार धाम यात्राही स्थगित केली.

Char Dham Yatra – चार धाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित, धोक्याची घंटा वाजताच प्रशासन झालं अलर्ट

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपुनर्विकास समितीचा आज अहवाल स्वयंपुनर्विकास समितीचा आज अहवाल
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची...
साखरपुड्याहून परतत असताना वाटेतच काळाचा घाला, मिनी बसची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
London Plane Crash – लंडनमध्ये छोटे प्रवासी विमान कोसळले, उड्डाण घेताच भीषण आग
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त होणार, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
IND vs ENG 3rd Test – सामना निर्णायक वळणावर! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 135 धावांची आणि इंग्लंडला 6 विकेटची गरज
मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात, या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा
प्रोफेसर शरीरसंबंधासाठी वारंवार जबरदस्ती करत होता, विद्यार्थिनीने कॉलेज कँम्पसमध्येच उचलले टोकाचे पाऊल