31 वेळा एव्हरेस्ट सर करून मोडला स्वतःचा विक्रम, कामी रिता शेर्पा यांना सतावतेय हिमालयाची चिंता

31 वेळा एव्हरेस्ट सर करून मोडला स्वतःचा विक्रम, कामी रिता शेर्पा यांना सतावतेय हिमालयाची चिंता

नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी वयाच्या 55 व्या वर्षी 31 व्यांदा एव्हरेस्ट सर करून स्वतःचा विक्रम मोडला. 27 मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी फत्ते केली. त्यानंतर दोन दिवसांनी ते नेपाळची राजधानी काठमांडूला परतले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना कामी रिता शेर्पा यांनी हिमालयाबद्दल चिंता व्यक्त केली. विशेषतः हिमालयावर हवामान बदलाच्या परिणामांबद्दल ते चिंतित आहेत.

हिमालयावर हवामान बदलाचे परिणाम दिसत आहेत. हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. आपले पर्वत हळूहळू काळे होत आहेत, असे कामी रिता शेर्पा यांनी सांगितले. ही परिस्थिती म्हणजे आता हिमालयीन प्रदेशासाठी, परिसरासाठी आणि तिथे राहणाऱ्या लोकांसाठी गंभीर स्वरूपाची धोक्याची चिन्हे आहेत. बदलणाऱ्या हवामानाबाबत केलेल्या संशोधनानुसार हिमालयातील सरासरी तापमान 0.3 ते 0.7 अंश सेल्सिअस दराने वाढत चालले आहे. परिणामी हिमनद्या वितळत आहेत. बर्फाचे थर कमी होत आहेत. अनेक हिमनदी तलावदेखील फुटू लागले आहेत.

अनेक गिर्यारोहक दरवर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी येतात. दरवर्षी जगभरातून गिर्यारोहक मे महिन्यात नेपाळमध्ये येतात. अनुकूल हवामानाचा फायदा घेत गिर्यारोहण करतात. 2025 मध्ये नेपाळ सरकारने गिर्यारोहणासाठी सुमारे 500 एव्हरेस्ट शिखर परवाने जारी केले आहेत. हे परवाने घेणारे बहुतेक आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहेत. विशेष म्हणजे 250 हून अधिक गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर यशस्वीरीत्या सर केले.

वायूचा वापर हानिकारक

अनेक गिर्यारोहक आणि शेर्पा समुदायामध्ये वेगवान पद्धतीने गिर्यारोहण करण्यासाठी झेनॉनचा वापर केला जातोय. ही पद्धत गिर्यारोहणाच्या पद्धतीला हानी पोहोचवणारी आहे. त्यामुळे गिर्यारोहणाच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती कामी रिता यांनी व्यक्त केली. प्रतिबंधित वायूचा वापर होण्याचे प्रकार वाढत आहेत. नेपाळ सरकारने एव्हरेस्टवर वेगाने चढाई होणाऱ्या प्रकारांची चौकशी सुरू केली आहे. वायूचा वापर करून एव्हरेस्टवर वेगाने चढाई चालू राहण्याची प्रथा चालू ठेवली तर गिर्यारोहण परंपरा नष्ट होण्याचा धोका काही शेर्पांना वाटतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;