लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली

लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली

लाडकी बहीण योजना राबवण्यात चूक झाली अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कुणावरही कारवाई करणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. दोन-तीन महिन्यातच लगेच निवडणूक लागू होणार होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. ही योजना आणताना आम्ही आवाहन केलं होतं की ज्या गरजू आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा. ज्या गरजू नसतील त्या महिला अर्ज करणार नाही असे आम्हाला वाटलं होतं. पण त्यांनीही अर्ज केला आणि लाभ घेतला. ही योजना राबवताना चूक झाली. असे असले तरी दिलेले पैसे आम्ही काढून घेणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;