Mental Health- तुमच्यामध्ये मानसिक आजाराची ‘ही’ लक्षणे आहेत का, वेळीच सावध व्हा

Mental Health- तुमच्यामध्ये मानसिक आजाराची ‘ही’ लक्षणे आहेत का, वेळीच सावध व्हा

आपल्या दैनंदिन जीवनातला ताण-तणाव कधी वाढतो आणि नैराश्यात बदलतो हे आपल्याला कळतही नाही. या नैराश्याचा मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे विनाकारण राग येणे, वारंवार रडणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. अनेक लोक हे जाणून घेतल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. मानसिक आरोग्य बिघडण्याची इतरही अनेक लक्षणे आहेत, याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.

वाईट मानसिक आरोग्याची चिन्हे

सामाजिक घटकांपासून अंतर राखणे
मानसिक आरोग्य उत्तम नाही याचे हे सर्वात मोठे लक्षण आहे. यामध्ये व्यक्ती सामाजिक संबंध सोडून देते. समाजापासून दूर राहिल्याने मानसिक आजार वाढतात.

कामातील दिरंगाई
अति काळजी केल्याने, अनेकदा कामावर खूप मोठा परिणाम होतो. काम कोणतेही असो, ते चालढकल करण्याची वृत्ती वाढू लागते. तसेच आपण कोणतेही काम करु शकत नाही असे वाटण्यास सुरुवात होते.

भूकेवर परिणाम 
मानसिक आरोग्याशी संबंधित आजार हा भूक न लागण्याचे पहिले लक्षण आहे. यामध्ये अनेकदा अपचनाचा त्रास होऊ शकतो. एकतर विचार न करता अति खाता किंवा भूक उडते असे बदल घडायला सुरुवात होते.

वजनात बदल
चिंता किंवा ताण आपल्या खाण्याच्या पद्धतींद्वारे वजनावर परिणाम करू शकतो. यामध्ये वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढण्याची किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त कमी होण्याची शक्यता असते.

परिस्थिती हाताबाहेर जाणे
काही लोक सहजपणे धक्क्यातून बाहेर पडतात आणि त्यांचे आयुष्य पुढे नेतात. पण काही लोकांसाठी हे थोडे कठीण होते. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर हे मानसिक आरोग्य बिघडल्याचे लक्षण असू शकते.

आत्मविश्वासाचा अभाव
खराब मानसिक आरोग्य आत्मविश्वासावर मोठा परिणाम करते. बराच काळ अपराधीपणाने जगणे म्हणजे स्वतःला प्रश्न विचारण्यासारखे आहे. यामध्ये काही चूक झाल्यास तुम्ही स्वतःला जबाबदार धरता.

जास्त काळजी किंवा चिंता
कोणत्याही गोष्टीची अति काळजी वाटू लागणे. तसेच उगाचाच चिंताग्रस्त परिस्थिती नसताना, त्यावर चिंता करत राहणे हे दिवसागणिक वाढू लागते. हे प्रमाण इतके वाढते की छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी करणे थांबणे नंतर कठीण होऊ शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

RCB Won IPL 2025 :  अनुष्का शर्माची ‘ती’ गोष्ट विराटसाठी ठरली लकी ? आरसीबीच्या विजयामुळे अनुष्काही भावूक RCB Won IPL 2025 : अनुष्का शर्माची ‘ती’ गोष्ट विराटसाठी ठरली लकी ? आरसीबीच्या विजयामुळे अनुष्काही भावूक
Virat Kohli – Anushka Sharma : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांचे स्वप्न...
RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार हा प्रसिद्ध अभिनेता?
फिल्म इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टवरून वाद
ऐसे तुकर तुकर का देखत हो? भन्नाट डायलाॅगच्या जुगलबंदीसह आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला
टेस्ला अमेरिकेत कार बनवून हिंदुस्थानात विकणार, कंपनी मुंबईसह फक्त 2 शोरूम उघडणार
शेतकऱ्यांनी मोगरा नदीत फेकला, भाव कोसळला.. बळीराजा कोलमडला
एलॉन मस्क यांचा एक्सचॅट अ‍ॅप आला; व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामला टक्कर देणार