70 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा कोटींचा गंडा; भिवंडी पोलिसांनी 24 तासांत भामट्याच्या मुसक्या आवळल्या

70 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा कोटींचा गंडा; भिवंडी पोलिसांनी 24 तासांत भामट्याच्या मुसक्या आवळल्या

मोबाईल एक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 70 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत भामट्याने सहा कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. भामटा सूरजपालसिंह चौहान याने व्यावसायिकांकडून कर्ज काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेतली आणि त्या कागदपत्रांच्या मदतीने विविध बॅंकांमधून सहा कोटींचे कर्ज घेतले. याप्रकरणी व्यावसायिक नरपतकुमार चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर तालुका पोलिसांनी 24 तासांच्या आत भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

व्यावसायिक नरपतकुमार चौधरी (28) यांनी सप्टेंबर 2019 मध्ये भिवंडीत मोबाईल एक्सेसरीज विक्रीचे दुकान सुरू केले होते. 2020 मध्ये त्यांनी स्वतःची एक्सेसरीज बनवणारी कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी लागणारी इंजेक्शन मोल्डिंग मशीन व इतर साहित्य खरेदीसाठी त्यांना 63 लाखांचे कर्ज हवे होते. याचदरम्यान ते जी पॉवर इंटरप्रायजेस कंपनीचे सूरजपालसिंह चौहान याच्या संपर्कात आले. नरपतकुमार यांना कर्ज मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सूरजपालसिंह याने स्वतःच्या ताब्यात घेतले आणि विविध बँक आणि खासगी वित्तीय संस्थांमधून सहा कोटी 29 लाख 61 हजार 281 रुपयांचे कर्ज काढले. याप्रकरणी पोलिसांनी 24 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून मुख्यसूत्रधार सूरजपालसिंह याला जेरबंद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;