Hair Care-केसांना फक्त दहा मिनिटे दही लावून ठेवा, केस होतील सुंदर घनदाट ! वाचा सविस्तर

Hair Care-केसांना फक्त दहा मिनिटे दही लावून ठेवा, केस होतील सुंदर घनदाट ! वाचा सविस्तर

केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, दही हा एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या घडीला केसगळतीच्या समस्येने पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्रस्त आहेत. अशावेळी अगदी साधे सोपे घरगुती उपाय खिशालाही परवडणारे असतात आणि केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हितावह असतात.

महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होता. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी तेल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या तेलाच्या जोडीने इतर केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सोप्पे मास्क लावून केसगळती थांबवू शकतो. घरगुती उपाय केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी.

Hair Care- पांढरे केस काळे करण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, केस होतील कोळशासारखे काळे

केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दहीमध्ये केसांसाठी आवश्यक असणारी  खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.

अकाली केस पांढरे होणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येते. आवळाचा रस, लिंबाचा रस, नारळ तेल समप्रमाणात घ्यावे. या मिश्रणाने केसांच्या मूळाशी मालिश करावी. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध लागतो.

 

केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा. किमान 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे.

केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस  20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी केळी आणि मध हे एक उत्तम कॅम्बिनेशन आहे. कोरड्या केसांसाठी केळी आणि मध एकत्र करून केसांना लावावे. हा केसांचा मास्क किमान 15 मिनिटे ठेवावा. केस मऊसुत होण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडे दही मिसळा आणि केसांना आणि टाळूवर लावा. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि केसांमध्ये चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;