आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा, हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक

आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा, हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक

आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत टोळक्याने रामटेकडी परिसरात राडा घातला. हातात शस्त्रे नाचवित, दगड गोटे फेकून परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यासोबतच तरूणाला शस्त्राने मारहाण करीत दोन महिलांना दगडाने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी एका आरोपी वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३१ मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास हडपसर परिसरातील रामटेकडीत घडली आहे.

महेश विकास शिंदे (वय 20 रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रेम उर्फ पिटर्‍या थोरात (वय 21) दुर्वेश उर्फ बल्ल्या गायकवाड (वय 18) अरविंद उर्फ नक्या माने (वय 18) नितीन पाटोळे (वय 18) ओंकार देढे (वय 20) चेतन बावरी (वय 19 सर्व रा. रामटेकडी, हडपसर ) यांच्यासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलावती सतीश देडगे (वय 50) आणि अनिता विश्वजीत ठोसर (वय 38) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. संतोष छबुराव सुपेकर (वय 45 रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर वय 22 हे 31 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास रामटेकडी परिसरात बोलत थांबले होते. त्यावेळी 8 ते 10 जणांचे टोळके त्याठिकाणी हातात शस्त्रे, दगडगोटे घेउन आले. त्यांनी परिसरात दगडफेक करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यानंतर टोळक्याने संतोषला अडवून तू प्रण्याबरोबर का फिरतोस अशी विचारणा केली. टोळक्याने संतोषला शस्त्राने आणि दगडानेही मारहाण केली. आम्ही इथले भाई आहोत, अशी धमकी देउन परिसरात पुन्हा दगडफेक केली. त्यानंतर हातातील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यानंतर नीलावती आणि अनिता यांच्यावर दगडफेक करीत त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बकवास, सगळे घाणेरडे..; कोणावर इतक्या चिडल्या जया बच्चन? व्हिडीओ व्हायरल बकवास, सगळे घाणेरडे..; कोणावर इतक्या चिडल्या जया बच्चन? व्हिडीओ व्हायरल
दिग्दर्शक रोनो मुखर्जी यांच्या निधनानंतर मंगळवारी मुंबईत प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता...
टीव्हीवरील ‘राम-सीते’च्या घरात चोरी; नोकरानेच केला हात साफ
अशोक सराफ शर्टची वरची दोन बटणं नेहमी उघडी का ठेवतात? स्वत:च सांगितलं होतं कारण
सकाळी की संध्याकाळी… कोणत्या वेळी सायकल चालवणे ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याचे तज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय, असा घ्या आहार
लडाखमध्ये 85 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांसाठी राखीव, केंद्र सरकारचा निर्णय
अहिल्यानगरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष गैरहजर; भाजपमधील वाद चव्हाट्यावर