राहणीमान कायम ठेवण्यासाठी पत्नीला 50 हजारांची पोटगी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

राहणीमान कायम ठेवण्यासाठी पत्नीला 50 हजारांची पोटगी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

घटस्फोटानंतर पत्नीने दुसरा विवाह केलेला नसेल आणि ती स्वतंत्रपणे जगत असेल तर तिला पूर्वीच्या विवाहदरम्यानचे तिचे राहणीमान कायमस्वरूपी ठेवण्याकरिता व भविष्य सुरक्षित करण्याकरिता पोटगी वाढवण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तसेच या प्रकरणी पत्नीला 50 हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पोटगीची ही रक्कम कोलकाता उच्च न्यायालयाने पूर्वी मंजूर केलेल्या रकमेच्या जवळपास दुप्पट आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने राखी साधुखान विरुद्ध राजा साधुखान या खटल्यात हा निकाल दिला. हे जोडपे 1997 मध्ये विवाहबद्ध झाले होते. 2008 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगा आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने पूर्वी घटस्फोट देताना या महिलेला 20 हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिला होता. तसेच दर तीन वर्षांनी यामध्ये 5 टक्क्यांची वाढ करण्याचेही निर्देश दिले होते. मात्र ही पोटगी रक्कम पुरेशी नसल्याने पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. लग्नादरम्यानचे राहणीमान कायम ठेवण्याकरिता ही पोटगी रक्कम अपुरी असल्याचे तिने म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;