NEET PG 2025 – नीट पीजी परीक्षा पुढे ढककली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर एनबीईएमएसचा निर्णय

NEET PG 2025 – नीट पीजी परीक्षा पुढे ढककली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर एनबीईएमएसचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नीट पीजी 2025 परीक्षा ढकलली आहे. नीट पीजी 2025 ची परीक्षा 15 जून 2025 रोजी होणार होती. गेल्या आठवड्यात एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्राधिकरणाला एकाच शिफ्टमध्ये नीट परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

नीट परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी न्यायालयाने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत एकाच शिफ्टमध्ये ही परीक्षा घेणार असल्याचे एनबीईएमएसने सोमवारी स्पष्ट केले. नीट पीजी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टल वगळता कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एनबीईएमएसने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;