मनरेगा घोटाळ्यात भाजप मंत्र्यांच्या मुलाला पुन्हा अटक, नुकताच मिळाला होता जामीन

मनरेगा घोटाळ्यात भाजप मंत्र्यांच्या मुलाला पुन्हा अटक, नुकताच मिळाला होता जामीन

गुजरातमधील भाजपचे मंत्री बच्चूभाई खाबड यांचा मुलगा बलवंत खाबड याला पुन्हा अटक केली आहे. मनरेगा घोटाळ्या प्रकरणी बलवंत खाबडला पोलिसांनी अटक केली होती. आता याच प्रकरणात नवीन गुन्हा दाखल झाल्याने खाबडला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये बलवंत खाबड आणि त्याचा भाऊ किरण खाबडविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दोघांना 29 मे रोजी जामीन मंजूर झाला आणि दोघे तुरुंगातून बाहेर आले होते. पण किरण राठोडला दुसऱ्या एका प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली होती. तर दाहोत पोलिसांनी बलवंत विरोधात गुन्हा दाखल केल्याने 31 मे ला पुन्हा अटक केली. बलवंत विरोधात पोलिसांनी हा तिसरा गुन्हा दाखल केला होता.

बलवंतच्या श्री राज कन्स्ट्रक्शन कंपनीला सरकारकडन 33.86 लाख रुपये मिळाले होते. मनरेगा प्रकल्पांतर्गत बलवंतला एका प्रकल्पाला साधन सामुग्री पुरवायची होती. ही साधन सामुग्री न पुरवताच बलवंतने हे पैसे लाटले होते.

बलवंतने मनरेगाच्या एकूण 71 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यात अेक कंपन्या स्थापून सरकारला मनरेगासाठी साधन सामुग्री पुरवायची होती. बलवंतने फक्त कागदोपत्री हे साधनसामुग्री पुरवली आणि कागदोपत्री काम झाल्या दाखवत 71 कोटी रुपये लाटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;