Relationship Tips- छोट्या गोष्टींवरुन तुमचे जोडीदारासोबत खटके उडताहेत का? नातं टिकवण्यासाठी या टिप्सचा वापर करा

Relationship Tips- छोट्या गोष्टींवरुन तुमचे जोडीदारासोबत खटके उडताहेत का? नातं टिकवण्यासाठी या टिप्सचा वापर करा

आजकाल कामाच्या वाढत्या ताणामुळे कोणाकडेही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ नाही. कामाचा हा वाढता ताण केवळ आपल्या शारीरिक आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही तर आपली मानसिक स्थिती देखील बिघडवत आहे. हेच कारण आहे की, अलीकडे जोडप्यांमध्ये चिडचिड वाढू लागली आहे. नवरा बायकोमधील चिडचिड ही नाते संपुष्टात येण्याचं एक पहिलं पाऊल आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला राग येत असेल तर, वेळीच सावध व्हायला हवे. काही सोप्या टिप्स फॉलो करून, तुमच्या जोडीदाराचा राग शांत करू शकता आणि तुमच्या नाते नव्याने फुलवू शकता.

काही जणांना छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिक होण्याची सवय असते. गरजेपेक्षा जास्त भावनिक होत असाल, तर तुमच्या जोडीदाराच्या रागाचे हे देखील एक कारण असू शकते. तुमच्या भावना व्यक्त करणे महत्त्वाचे आहे, परंतु त्याबद्दल वारंवार बोलणे चुकीचे ठरु शकते.

प्रेमी युगुलांमधील ब्रेकअपसाठी जबाबदार आहेत ‘या’ सवयी

तुमचा जोडीदार रागावला असेल, तर त्या काळात वारंवार प्रश्न विचारल्यानेही राग वाढू शकतो. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा राग शांत होण्याची वाट पहा. तुमचा जोडीदार रागावला असताना तो तुम्हाला योग्य उत्तर देणार नाही आणि उलट, वारंवार प्रश्न विचारल्याने त्याचा राग शांत होणार नाही. म्हणून राग कमी होण्याची वाट पाहणे महत्वाचे आहे.

वारंवार राग येण्याचे कारण चुकीच्या पद्धतीचा संवाद हेदेखील कारण आहे. तुमच्या जोडीदाराला असे वाटत असेल की, तुम्ही त्याचे ऐकत नाही तर हे देखील त्याचा राग वाढण्याचे कारण असू शकते. म्हणून जेव्हा तुमचा जोडीदार रागावतो तेव्हा तुम्ही त्याचे म्हणणे नेहमी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. तुम्ही असे केले तर तुमचा जोडीदार तुम्हाला राग आल्यावर तुमचे ऐकण्याचा प्रयत्न करेल.

नातेसंबंधांमध्ये नेहमीच काही ना काही भांडणे होतात. परंतु एखादा जुना मुद्दा उपस्थित करता किंवा जुना वाद नव्याने उकरुन काढता, तेव्हा राग शांत होण्याऐवजी तो वाढतो. म्हणून रागावलेले असताना तुमच्या जोडीदारासोबत कोणताही जुना विषय काढू नका.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;