बॉयफ्रेंडसोबत बिर्याणी खायला रेस्टॉरंटमध्ये गेली अन् घात झाला…

बॉयफ्रेंडसोबत बिर्याणी खायला रेस्टॉरंटमध्ये गेली अन् घात झाला…

बिर्याणी खायला अनेकांना आवडतं चिकन. मटण बिर्याणीचे बरेच लोक शौकीन असतात, पण ती खाताना काळजी घ्यावी लागते, कारण ते पीसेस घशात अडकून त्रास होण्याची शक्यता असते. असाच काहीस प्रकार पालघरमध्ये घडला. तेथे एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड सोबत बिर्याणी खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली पण तिथेच तिचा घात झाला. जेवत असतानाच असं काही घडलं ज्यामुळे तिला जीव गमावावा लागला. बिर्याणी खाताना त्या तरूणीच्या घशात चिकनचा एक पीस अडकला आणि त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पाहता पाहता परिस्थिती बरीच बिघडली, ते पाहून त्या तरूणीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं खरं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात उपचार होण्यापूर्वीच त्या तरूणीचा मृत्य झाला. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून तरूणीचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. दोघांनी तिथे बिर्याणी ऑर्डर केली. त्यांनी खूप आनंदाने बिर्याणी खाल्ली. पण त्याच दरम्यान, बिर्याणी खाताना, मुलीच्या घशात चिकनचा तुकडा अडकला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. चिकनचा तो पीस बराच वेळ मुलीच्या घशात अडकला होता. त्यामुळे ती जागीच बेशुद्ध पडली.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास

ते पाहून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्या तरूणीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पण मुलीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीच्या मृत्यूची बातम ऐकून कुटुंबियांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आणि ते शोकाकुल झाले.

पोलीस पाहतायत पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट

ती मृत मुलगी 27 वर्षांची होती. आता अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, पोस्टमॉर्टेम रिपोर्टचीही वाट पाहत आहोत, असे पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी याप्रकरणी सांगितलं. चिकनचा पीस घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू झाला की त्यामागे काही कट होता हे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल. यासोबतच, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Monsoon Update :  जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर IMD Monsoon Update : जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, दरम्यान जून महिन्यात देशभरात मान्सूनच्या...
IPL 2025 – जितेश शर्माच्या वादळात लखनऊचा धुव्वा; विराटनेही फोडून काढलं, RCB चा 6 विकेटने दणदणीत विजय
Video ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री सन्मान प्रदान
Photo – पांढऱ्या कॉर्डसेटमध्ये नुशरतच्या दिलखेच अदा
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान
Crime News – जीन्स घातली म्हणून मोठा भाऊ संतापला, लहान भावाचा गळा चिरला
चंद्रपूरमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी