चार राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर, 19 जूनला मतदान; 23 जूनला मतमोजणी
देशातील चार राज्यांमधील पाच जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या संदर्भात रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने एक अधिसूचना जारी करून 19 जून रोजी निवडणुका होणार असल्याची माहिती दिली. मतमोजणी 23 जून रोजी होईल.
दरम्यान, राजीनामे किंवा मृत्यूमुळे पाचही जागा रिक्त झाल्या होत्या. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत, त्यात गुजरातमधील काडी आणि विसावदर विधानसभा जागा समाविष्ट आहेत. तसेच केरळमधील निलांबूर विधानसभा मतदारसंघ, पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील कालीगंज विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List