IPL 2025 – तळाला असलेल्या CSK ने टॉपला असलेल्या गुजरातचा उडवला धुव्वा, 83 धावांनी केला विजय साजरा

IPL 2025 – तळाला असलेल्या CSK ने टॉपला असलेल्या गुजरातचा उडवला धुव्वा, 83 धावांनी केला विजय साजरा

पाच वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईसाठी यंदाचा हंगाम एका वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. 14 पैकी 10 सामने गमावल्यामुळे संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. परंतु हंगामातील आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरातला पाणी पाजत 83 धावांनी मोठा विजय साजरा केला आहे.

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा चोपून काढल्या होत्या. ब्रेविस (57), कॉन्वे (52) आणि उर्विल पटेल (37) यांनी ताबडतोब फटकेबाजी केल्यामुळे चेन्नईला 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 230 धावांचा डोंगर उभा करता आला. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संपूर्ण संघ 18.3 षटकांमध्येच 147 धावसंख्येवर बाद झाला. साई सुदर्शन (41), अर्शद खान (20) आणि शाहरुख खान (19) यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले. परंतु इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत असल्यामुळे संघाला केवळ 147 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून अन्शुल कम्बोज आणि नुर अहमद यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बारामती, दौंड, इंदापुरात पावसाचा कहर; मंदिरे, घरे, रस्ते पाण्याखाली बारामती, दौंड, इंदापुरात पावसाचा कहर; मंदिरे, घरे, रस्ते पाण्याखाली
हवामान खात्याने पुणे शहरासह जिह्याला 27 मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. जिह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार...
नीलेश चव्हाणविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस
तिहेरी हत्याकांडाने पुणे जिल्हा हादरला
तब्बल एक कोटी रुपयांच्या जनावराच्या मांसाची वाहतूक, न्यायालयाकडून आरोपीला अटकेपासून संरक्षण
सुखद धक्का! मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात, बुधवारपर्यंत मुंबईत येणार
फडणवीस सरकारची हुकूमशाही, शासनाच्या निर्णयांवर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी
मिंध्यांनी पालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड दूर करावीच लागेल, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला