किशोरवयीन प्रेमाला गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्याचा विचार करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

किशोरवयीन प्रेमाला गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्याचा विचार करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

सरकारने लैंगिक शिक्षण धोरणासंदर्भात सूचनांचा विचार केला पाहिजे, तसेच किशोरवयीन प्रेमाला गुन्हेगारी श्रेणीतून विचार करावा, प्रेमसंबंधांतून किशोरवयीन मुलांना पॉक्सो कायद्याखाली तुरुंगात पाठवणे थांबवले पाहिजे, असे महत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. देशात लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य शिक्षणासाठी धोरण तयार करण्याचेही आदेश न्यायालयाने केंद्राला दिले आहेत.

न्यायाधीश अभय एस ओक आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत केंद्राला या प्रकरणाचा विचार करण्यासाठी आणि 25 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करण्याची नोटीस बजावली. अहवाल मिळाल्यानंतर न्यायालयाने पुढील निर्देश दिले जातील असे सांगितले.

पश्चिम बंगालमधील एक महिल 14 वर्षांची असताना तिच्या पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला पोक्सो अंतर्गत 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेपासून पतीचा बचाव करण्यासाठी सदर महिला कायदेशीर लढाई लढत आहे. या संवेदनशील मुद्द्यावर मदत करण्यासाठी न्यायालयाने माधवी दिवान आणि लिझ मॅथ्यू या दोन वरिष्ठ महिला वकिलांची नियुक्ती केली होती.

माधवी दिवान आणि लिझ मॅथ्यू यांनी असे सुचवले होते की, संमतीने झालेल्या संबंधांमध्ये किशोरवयीन मुलांना संरक्षण दिले पाहिजे. अल्पवयीन मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी पोक्सो कायद्याने एक महत्त्वाचा उद्देश पूर्ण केला असला तरी, किशोरवयीन संबंधांच्या प्रकरणांमध्ये त्याचा कठोर वापर केल्याने त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी सुचवले. वरिष्ठ वकिलांच्या सूचनांचा स्वीकार करत न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणात सहभागी करून घेतले आणि नोटीस बजावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शाब्दिक वादातून  कार डिलरची हत्या  शाब्दिक वादातून कार डिलरची हत्या 
दिवसाढवळ्या कार डिलरची हत्या झाल्याची घटना आज दुपारी घाटकोपर परिसरात घडली. शाब्दिक वादातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर हल्लेखोर...
आणखी एका विवाहितेने जीवन संपवले, सासरच्या मंडळींना पोलिसांनी घातल्या बेड्या
IPL 2025 – अखेर क्लासेनची बॅट म्यानातून बाहेर आलीच; हैदराबादने कोलकाताचा 110 धावांनी पराभव केला
Manoharlal Dhakad Arrested : महामार्गावर महिलेसोबत खुलेआम रोमान्स
आधी अपहरण नंतर अत्याचार गर्भपात करून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं, डोंबिवलीत अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं
सिन्नर : पावसाने बस स्थानकाच्या छताचा भाग कोसळून मोठा अपघात, शिवशाही बसेस सह अनेक वाहनांचे नुकसान
Pune News – इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ओढ्याला पूर, घरात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत