सतर्क राहून सोशल मीडिया वापरा, महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

सतर्क राहून सोशल मीडिया वापरा, महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

ऑपरेशन सिंदूर नंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण झाली आहे. फक्त सीमेवरच नाही तर सोशल मिडियावरही याचे पडसाद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडिया हाताळताना सावधगिरी बाळगा असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

महाराष्ट्र सायबरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरनंतर देशाच्या अनेक प्रणालींवर हल्ला झाले आहेत. त्यात “डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस” (DDoS) हल्ले आणि डिजिटल विद्रूपकरण मोहिमा यांचाही समावेश आहे. यात सरकारी कामातही अडथळे आणले गेले.

संस्थात्मक डिजिटल संसाधनांवर थेट हल्ला करण्याबरोबरच, घातक कृती करणाऱ्या घटकांनी त्यांच्या रणनीतीत विस्तार करत मालवेअर-इनफेक्टेड फाइल्स व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे, जे वैयक्तिक वापरकर्त्यांच्या उपकरणांवर हल्ला करू शकतात. या अपायकारक अॅप्स आणि डॉक्युमेंट्स सरकारी संबंधित फाइल्सच्या असल्याचे सांगत युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे युजरने अशा प्रकारांपासू सावध रहावे असे आवाहन सायबर सेलने केले आहे.

महाराष्ट्र सायबर विभाग सतत अशा घटनांवर लक्ष ठेवत आहे, उदयोन्मुख सायबर धोके ओळखत आहे आणि संभाव्य धोक्यांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी करत आहे. विभागाने लक्ष्य केलेल्या संस्थांना औपचारिकरित्या सावध केले असून, योग्य वेळी हस्तक्षेप आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सक्षम केले आहे.

सध्याच्या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सोशल मिडिया वापरताना अधिक सतर्क राहावे. Unknow Source कडून आलेल्या लिंक्स आणि फाईल्स ओपन करण्यापूर्वी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही दस्तऐवजाला सरकारी फाइल म्हणून डाऊनलोड करण्यापूर्वी, त्याच्या पाठवणाऱ्याची ओळख अधिकृत स्रोतांद्वारे निश्चित करावी. सायबर सुरक्षेसाठी अद्ययावत अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर, नियमित प्रणाली तपासणी, सुरक्षित लॉगिन पद्धती आणि द्वि-स्तरीय प्रमाणीकरण याचे कठोर पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आम्ही युद्धाच्या पक्षात नाही! NSA अजित डोवाल यांनी चीनच्या वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही युद्धाच्या पक्षात नाही! NSA अजित डोवाल यांनी चीनच्या वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितलं
    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून संवाद साधला की ‘हिंदुस्थान युद्धाच्या पक्षात
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, हिंदुस्थानी सैन्याला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; देशभरात संतापाची लाट
विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल
India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!
India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे