मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन
Vikram Gaikwad Passes Away: झगमगत्या विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. आपल्या मेकअप कौशल्यानं अनेक अविस्मरणीयवाड यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी विक्रम गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम गायकवाड यांच्या 10 मे म्हणजे आज संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशान भुमित अंत्यसंस्कार होणार आहेत.
भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विक्रम गायकवाड यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. एक ट्विट करत आशिष शेलार यांनी विक्रम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या आशिष शेलार यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत संवेदनशील आणि कुशल कलाकार हरपला आहे.
विक्रम गायकवाड यांनी आपल्या अद्वितीय मेकअप कौशल्याने अनेक व्यक्तिरेखा अविस्मरणीय केल्या, त्यांच्या हातून… pic.twitter.com/zNIUMjc5Kg
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 10, 2025
एक्सवर ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, ‘सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत संवेदनशील आणि कुशल कलाकार हरपला आहे. विक्रम गायकवाड यांनी आपल्या अद्वितीय मेकअप कौशल्याने अनेक व्यक्तिरेखा अविस्मरणीय केल्या, त्यांच्या हातून साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा ही त्यांच्या कलाप्रेमाची साक्ष होती. त्यांचं कार्य आणि योगदान कायमच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
कशी होती विक्रम गायकवाड यांची प्रकृती?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. उपचारासाठी त्यांनी पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान विक्रम गायकवाड यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी विक्रम गायकवाड यांना मृत घोषित केलं आणि इंडस्ट्रीने मोठा कलाकार गमावला. विक्रम गायकवाड यांच्या पश्चात पत्नी ज्योत्सना आणि मुलगी तन्वी असा परिवार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List