Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला, आठवडाभर धो-धो बरसणार, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला, आठवडाभर धो-धो बरसणार, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट

राज्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यंदा मे महिन्यावर पावसाने अधिक्रमण केले. अवकाळी पावसाने सूर्यदेवाला झाकळून टाकले. तर यंदा मान्सून सुद्धा सक्रिय झाला आहे. तो लवकरच येऊन धडकणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून धडकणार आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस धो धो बरसणार आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत पाऊस धो धो बरसणार आहे. अनेक भागांत मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वादळ तयार होण्याची शक्यता आहे.

किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता

आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले ते येत्या ३६ तासात अधिक तीव्र होईल. त्यामुळे त्याचे रुपांतर शक्ती या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्याची पुढची आगे कूच हे उत्तरेकडे असेल.

किनारपट्टीला अलर्ट

चक्रीवादळाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग हा ३५ ते ४० किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. तर काही ठिकाणी तो ताशी ६० किलोमीटर इतका सुद्धा वेग असू शकतो. या दरम्यान पुढील दोन ते चार दिवस मच्छीमारांनी गुजरात ते महाराष्ट्र या किनारपट्टीवर मासेमारी करता जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मुसळधार ते आत मुसळधार पाऊस असेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या
शुभांगी भुते यांनी दिली.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबईत गेल्या १० मिनिटांपासून पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून रात्रीच्या वेळी दाखल होत आहे. पावसाचे चित्र लोअर परळ भागातील आहे. रायगडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, लग्न मंडप ओले चिंब झाले.

रायगडला पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरु असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याच प्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनीही आपली होडी किनाऱ्यावर आणली आहे.

गुहागरमध्ये मुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये मुसळधार पाऊस पडला. गुहागर चिपळूण रोड वर गटारचे पाणी वाढले. ठिकठिकाणी सखल भागात पाणी वाढले. मागील सहा तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे.

५० गावांमधील पिकांचे नुकसान

मान्सून पूर्व पावसाने अमरावती जिल्ह्यातील ५० गावांमधील पिकांचे नुकसान झाले. तर १६ गावांमध्ये घरांचे नुकसान झाले. अमरावती शहरासह ८ तालुक्यांमध्ये झालेल्या या मुसळधार अवकाळी पावसाने फटका दिला. पावसामुळे सुमारे २५५.५ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, कांदा, भाज्या, तीळ, टरबूज, केळी, आंबा, संत्री, भुईमूग आणि इतर पिके बाधीत झाली आहेत. जास्तीत जास्त १४ गावे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे. केळी, कांदा आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील १६ गावांमधील ९४ घरे कोसळली तर ११ गुरे मृत्युमुखी पडली आहेत.

शेतीची कामे खोळंबली

वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अकराव्या दिवशी अवकाळी पाऊस सुरू आहे. सतत पडत असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती मशागतीचे कामे खोळंबून गेली आहेत. शेतकरी आता मशागतीसाठी आणि इतर शेती कामासाठी उघडीपची प्रतिक्षा करत आहेत.

वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोर कायम आहे.:पावसाळा लागल्यास अघवे पंधरा दिवस बाकी असल्याने शेतकरी मान्सून पुर्व मशागत करत आहे. अशातच पैठणच्या थेरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो घरावरील पत्रे उडून गेली आहे.शेतात असलेल्या बहुतांश मोसंबीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या तर पपई, आंबा, डाळींब, या फळबागासह झाडे तुटुन तर काही उन्मळून घरावर, रस्त्यावर पडली. वादळी वाऱ्यामुळे कच्ची पत्र्याची घरे भूईसपाट झाली. शेकडो घरांवरील पत्रे उडून गेली.शेतातील अनेक विजेचे खांब अन् तारा तुटल्या तर झाडे उन्मळून पडलली.तर शेतात असणाऱ्या शेडनेटचे देखील उभारणी केलेले आहे. मात्र सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी वादळी वाऱ्याने शेती संपूर्ण जमीनदोस्त झाली आहे तर शेडचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे

धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

धाराशिव जिल्ह्यातील 7 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 81 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पाऊसाची नोंद लोहारा तालुक्यातील माकणी मंडळात झाली. धाराशिव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्यांच्या बागा, केळीच्या बागा, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान होत आहे. या पावसासह वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडणे, तारा तुटण्याचे प्रकार समोर येत असून त्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. काल रात्री देखील जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

तर तुळजापुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडला. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. पावसामुळे नववधू वरांचीही फजिती झाली. तसेच तुळजाभवानी मंदिराच्या दारातील व्यापाऱ्यांचीही त्रेधातीरपीट उडाली. धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाची धुवाधार बॅटिंग केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

… तर राजकारणी महिलांनी तोंड उघडू नये, करुणा शर्मा यांनी काय केली मागणी ? … तर राजकारणी महिलांनी तोंड उघडू नये, करुणा शर्मा यांनी काय केली मागणी ?
मला धनंजय मुंडे यांनी स्वत: धमकी दिलीय त्याचे गुंड धमकी देत आहेत. त्याविषयी माझ्या तक्रारींचं निराकरण झालेले नाही. माध्या कारमध्ये...
देशाचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले, ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका
Satara News – साताऱ्यात धो-धो पाऊस, JCB च्या सहाय्याने पुरात अडकलेली वाहनं वाचवली!
सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट
Sindhudurg News – अवकाळी पावसाचा फटका; कणकवली-आचरा राज्यमार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण
Kolhapur Rain चौथ्या दिवशीही कोल्हापूरात धुवांधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांची वाढ
Skin Care- कच्च्या दुधात या 6 गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावा, अनोखा ग्लो तर येईलच शिवाय त्वचा होईल मुलायम