Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यात कृत्रिम वाळू धोरणाबाबत मोठा निर्णय, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी, काय होणार फायदा

Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यात कृत्रिम वाळू धोरणाबाबत मोठा निर्णय, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी, काय होणार फायदा

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या अथवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पण धोरण आखण्यात आले. राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून अद्ययावतीकरण धोरणास मंजुरी देण्यात आली आहे.  राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे.  इतर ही काही धडाडीचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहे.

हे आहेत मंत्रिमंडळ निर्णय

१) रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता. २९ महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात ३१ मोबाईल व्हॅन, यासाठी सुमारे ८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.  (महिला व बालविकास विभाग)

२) नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधितांना ‘होम स्वीट होम’ अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कमी करुन केवळ एक हजार रुपये आकारणार आहे. (महसूल विभाग )

३) कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी – प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार, एम-सँड तयार करणार्‍या युनिटला २०० रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार. पर्यावरणाची हानी टळणार आहे. (महसूल विभाग)

४) राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत. ८० कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे. (वित्त विभाग)

५) राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून अद्ययावतीकरण धोरण – आयटीआयला जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रुपांतरित करणे हा मुख्य हेतू, उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगारक्षमता वाढणार, प्रॅक्टिकल लर्निंग आणि अप्लाईड लर्निंगचे उद्देश साध्य होणार आहे. (कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग)

६) राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी चिंचोली (ता. कामठी) जिल्हा नागपूर येथील २०.३३ हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  (महसूल विभाग)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना थारा नाही, पत्नीचे फुटेज मागणाऱ्या पतीला कोर्टाचा हिसका आधुनिक भारतात पुरुषप्रधान विचारांना थारा नाही, पत्नीचे फुटेज मागणाऱ्या पतीला कोर्टाचा हिसका
आधुनिक समाज जीवनातील पुरुषप्रधान कल्पनांबाबत दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या...
IPL 2025 – हैदराबादचा मोठा धमाका; RCB चा धुव्वा उडवत 42 धावांनी जिंकला सामना
Photo – उफ्फ!!! कान्स डेब्यू साठी आलियाने निवडला सिंपल लूक, चाहते झाले इम्प्रेस
SIT म्हणजे डोळ्यात धुळफेक, सोयिस्कररित्या तयार केलेली कमिटी… धुळे वसूली कांडावरून अनिल गोटेंची फडणवीसांवर टीका
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक
Ratnagiri News – रत्नागिरीत पावसाची संततधार सुरुच, नाचणेत दरड कोसळली
आम्ही तुमच्या सोबत, न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; उद्धव ठाकरे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी साधला संवाद