नव्या सरन्यायाधीशांच्या आईलाही वाटतं निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात, काय म्हणाल्या कमलताई गवई?
अमरावतीचे सुपूत्र भूषण गवई हे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई यांच्या मोतोश्री कमलताई गवई या चांगल्याच भावुक झाल्या आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले. भूषण गवई यांना लहानपनापासूनच समजसेवेची आवड होती, आज आई म्हणून मला प्रचंड अभिमान वाटत आहे, देशाच्या हिताचे निर्णय भूषण गवई घेतील अशी भावना यावेळी भूषण गवई यांच्या आईने व्यक्त केली आहे.
दरम्यान भूषण गवई हे उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्याकरिता त्यांचं संपूर्ण कुटुंब आज दिल्लीला रवाना होणार आहे. त्यापूर्वी भूषण गवई यांच्या आईने येत्या काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भूषण गवई बॅलेट पेपर संदर्भात प्रलंबित निकालावर काय निर्णय देतात? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील. बाबासाहेबांनी संविधानात लोकांना केंद्रबिंदू ठेवलं आहे. लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात असं वाटतं. बॅलेट पेपर केव्हाही चांगलं आहे, यापूर्वी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या, असं मत यावेळी गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभाव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं. महायुतीच्या राज्यामध्ये तब्बल 232 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, त्यानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत अशी मागणी होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जाणकर यांनी मोठं आंदोलन देखील उभारलं आहे, माहाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List