‘सासऱ्यांना नातू हवा होता, प्रेग्नेंसीमध्ये रोज फोन करायचे आणि…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आज भारतीय समाजात मुलगा आणि मुलगी असा भेद नाही. हा भेद नाहिसा करण्यासाठी देखील अनेक प्रयत्न सुरु आहेत. पण आजही काही भागांमध्ये लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जातो. तुम्हाला वाटेल की समाजातील फक्त खालच्या स्तरातील लोकच या प्रकारचा भेदभाव करतात, पण तसं नाही. नुकताच एका अभिनेत्रीने सांगितलं आहे की, प्रेग्नेंसी दरम्यान तिच्याकडून एका मुलाची अपेक्षा होती. ती अभिनेत्री कोण आहे, जिने प्रेग्नेंसी आणि मुलाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा तिच्या सासरच्यांना नात नाही तर नातू हवा होता.
अभिनेत्री म्हणाली, ‘मी तेव्हा लंडनमध्ये होती आणि तिथे लिंग तपासणी करतात. त्यामुळे मी लिंग तपासणी केली आणि मला कळलं की, मी एका मुलीला जन्म देणार आहे. कुटुंबियांना मुलगी होणार असं सांगितल्यानंतर ते आनंदी होते. पण सासरे नाराज होते.’
‘मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा मला रोज सासऱ्यांचा फोन यायचा आणि ते मला म्हणायचे मला नातू हवा आहे. त्यांच्या अशा विचारसरणीमुळे मी हैराण झाले होते.’ सासऱ्यांच्या अजब मागणीनंतर अभिनेत्रीने सासऱ्यांसोबत बोलणं देखील बंद केलं होतं. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेची आठवण करून देताना अभिनेत्री म्हणाली की, अनेक महिलांना यातून जावं लागतं.
सुचित्रा कृष्णमूर्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता आभिनेत्री मोठया पडद्यापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री मुलीसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List