Operation sindoor: झेंडे वेगळे असले तरी दु:ख मात्र…, सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

Operation sindoor: झेंडे वेगळे असले तरी दु:ख मात्र…, सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

Operation sindoor: पहलगाम याठिकाणी दहशतवाद्यांनी सामान्य जनतेला लक्ष्य केलं. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर याचाच बदल घेत भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं आणि पाकिस्तान येथे असलेल्या दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. अशात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सेनेला पाठिंबा देत आहेत. दरम्यान भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिची देखील एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सानिया मिर्झा हिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “Diplomacy isn’t weakness. Peace isn’t a luxury. It’s the only way forward…” असं सानियाने पहिल्याच ओळीत लिहिलं आहे. शांती हाच एक पर्याय आहे असं सानियाने पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावरपोस्ट करत सानिया म्हणाली, ‘शांततेला सर्वांनी प्राधान्य दिलं पाहिजे… राजनैतिक संवाद ही कोणती कमजोरी नाही, शांती म्हणजे चैनीची गोष्ट नाही, ती प्रत्येकालाच हवी असते. शांतीच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. Escalation मुळे काय होतं आपण पाहिलं आहे.’

गाझापासून इस्रायलपर्यंत, पुलवामापासून पहलगामपर्यंत, रशियापासून युक्रेनपर्यंत …. झेंडे वेगळे असले तरी दु:ख मात्र सारखंच दिसतं..’ असं देखील सानियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या सर्वत्र सानियाची पोस्ट व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, याआधी देखील सानियाने हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली. तेव्हा सानियाने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं कौतुक केलं. त्याचा फोटो शेअर करत सानिया म्हणाली, ‘या अत्यंत पॉवरफुल फोटोमध्ये परफेक्ट संदेश देण्यात आला आहे की एक देश म्हणून आपण काय आहोत.’ सांगायचं झालं तर, सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी ऑपरेशनबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, शनिवारी अमेरिकेच्या मध्यस्थिनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धविराम तोडला आहे. पाकिस्तानकडून बारामुल्ला आणि राजौरी परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून युद्धविरामानंतर देखील शस्त्रासंधीच उल्लंघन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त एक हजार किलो डाळिंब वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या...
नॅशनल पार्कमधील रहिवाशांची बाजू ऐकून घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात अपयश; बांगलादेशी महिलेला हायकोर्टाकडून जामीन
जुलैमध्ये म्हाडाची चार हजार घरांसाठी लॉटरी; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे
सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
…अन्यथा आरटीओच्या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाणार; मालमत्ता वाचवण्यासाठी परिवहन विभागाची सरकारकडे 504 कोटींची मागणी
आता कुरापत काढाल तर तडाखा देऊ! तिन्ही दलांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानला ठणकावले