Operation Sindoor – बिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, पाकड्यांच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्रांच्या चिंधड्या

Operation Sindoor – बिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, पाकड्यांच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्रांच्या चिंधड्या

हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क आणि सज्ज असलेल्या हिंदुस्थानने पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव उधळून लावला आहे. श्रीनगर, चंदीगडसह 15 शहरांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव हाणून पाडण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीला हिंदुस्थानने पाकमध्ये एकामागून एक ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानने जम्मू-कश्मीरपासून ते पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, भूजमधल्या लष्करी तळांवर हल्ल्यावर प्रयत्न केला. पाकिस्तानने ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र केला. मात्र, सज्ज असलेल्या हिंदुस्थानने पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला आहे. Integrated Counter-UAS Grid आणि Air Defence Systems चा उपयोग करत हिंदुस्थानने पाकड्यांचा हल्ल्याचा उधळून लावला आहे.

Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

हिंदुस्थानच्या लष्कराकडून याबाबत पत्रक जारी करत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला आहे. या हल्ल्याचे पुरावे असलेले आणि नष्ट केलेले ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे सांगाडे वेगवेगळ्या ठिकाणांहून हस्तगत करण्यात आले आहेत, असे हिंदुस्थानच्या लष्कराने पत्रकात म्हटले आहे.

Operation Sindoor हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;