Pahalgam Attack नंतर हिंदुस्थानच्या लष्करानं उचलली पाऊलं; PoK मधील 42 दहशतवादी लाँच पॅड शोधून काढले

Pahalgam Attack नंतर हिंदुस्थानच्या लष्करानं उचलली पाऊलं; PoK मधील 42 दहशतवादी लाँच पॅड शोधून काढले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 जण ठार झाल्यानंतर 40 तासांमध्ये हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांनी पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये असलेल्या विशिष्ट दहशतवादी लाँच पॅड आणि प्रशिक्षण शिबिरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

गुप्तचर संघटनांच्या माहितीनुसार, या ठिकाणांवर हिंदुस्थानी यंत्रणा बारकाईने लक्षं ठेवत आहेत. इथल्या दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात येत आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

लष्कर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याभागाची अचूक माहिती आणि घुसखोरीविरोधात कारवाई करण्यासाठीचे विविध पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीतून समोर आले आहे की जम्मू आणि कश्मिरात विरुद्ध घुसखोरी करण्यासाठीच्या विविध छावण्यांमध्ये अंदाजे 150-200 प्रशिक्षित दहशतवादी सध्या तैनात आहेत.

पाकिस्तानी सैन्य या घुसखोरीसाठी मदत करत असल्याचे वृत्त आहे. बट्टल सेक्टरजवळ अलिकडेच तसा प्रयत्न झाला. त्यावेळी मोठी चकमक झाली. या अयशस्वी घुसखोरीच्या प्रयत्नात 642 मुजाहिद बटालियनला मोठे नुकसान झाले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

याव्यतिरिक्त, जम्मू आणि कश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन (एचएम), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे एकूण 60 परदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रशासित प्रदेशात सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 17 इतकी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर
हिंदुस्थानने जैलसलमेरमध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यातील पायलटला ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप या पायलटबाबतची कोणतीही माहिती समोर...
Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदर उद्ध्वस्त!
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
Big Breaking Operation Sindoor- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
देशाच्या सार्वभौमत्वाचे व जनतेचे संरक्षण करायला आम्ही पूर्णपणे तयार, हिंदुस्थानी संरक्षण दल सज्ज
Opertion Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची एअर वॉर्निंग सिस्टीम (AWACS) केली नष्ट
Operation Sindoor- पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ला केला, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर