Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदर उद्ध्वस्त!

Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदर उद्ध्वस्त!

हिंदुस्थानी नौदल ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता सुरू झाला आहे.  जमीन, आकाशानंतर आता पाण्यावरून हल्ला करण्यास सुरवात केली आहे. हिंदुस्थानी नौदलाने पाकिस्तानविरुद्ध हल्ला सुरु केलेला आहे. हवाई दलानंतर आता नौदलही (Indian Navy Attack on Pakistan) अ‍ॅक्शनमध्ये उतरले आहे. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतने कराचीला लक्ष्य करून कहर करायला सुरुवात केली आहे. नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरात मोठी आग लागली आहे. कराची आणि ओरमारा बंदरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कराची आणि ओरमारा बंदरांवर आयएनएस विक्रांतवरून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही बंदरांवर मोठी आग लागली. या हल्ल्यामुळे दोन्ही बंदर शहरांमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. लोक घाबरून किनारी भाग सोडून आत पळत आहेत.

अहवालानुसार, पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे तळ आहेत. जिथे त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांचे मुख्यालय, युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. या दोन नौदल तळांना उद्ध्वस्त करून, आयएनएस विक्रांतने पाकिस्तानी नौदलाला मोठ्या प्रमाणात हादरवून टाकण्यात यश मिळवले आहे. सध्या हिंदुस्थानी नौदलाचे ऑपरेशन सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;