काम केले 50 हजारांचे, बिल काढले 2 लाखांचे! पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप

काम केले 50 हजारांचे, बिल काढले 2 लाखांचे! पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप

सेसगळती, शेतकरी, ग्राहक, वाहनचालकांची लूट, भ्रष्ट कारभार अशी ओळख असलेल्या पुणे बाजार समितीत विकासकामांच्या नावाखाली मनमानी पद्धतीने बिले काढण्याचे धंदे सुरू झाले आहेत. बाजारात विद्युत पॅनेल दुरुस्तीसाठी सुमारे पन्नास हजार रुपयांचा खर्च असताना प्रत्यक्षात तब्बल 1 लाख 94 हजार 794 रुपयांचे बिल कार्योत्तर मंजुरीने

अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एव्हढेच नाही तर अशा उलटसुलट कामासाठी पुणे सोडून चक्क धाराशिव येथील ठेकेदाराची निवड केल्याचे समोर आले आहे.

बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे भाजीपाला विभागातील सर्व ठिकाणचे विद्युत बॉक्सची व वेदर शेडची विजतंत्री विभागाने पाहणी केली. या पाहणीत विद्युत बॉक्सला झाकणे, लॉक, दरवाजे व त्यावरील वेदर शेडचे पत्रे खराब झाले असून ते बदलणे कामास व त्याकामी होणारे खर्चाचे अंदाजपत्रक विद्युत सल्लागार विजयकुमार दत्तात्रय जगताप यांच्याकडून मागविले. बंद पाकीट योजनेद्वारे बाजार समितीने मर्जीतल्या धाराशिव येथील जे. के. इलेक्ट्रिकल्स या ठेकेदाराला हे काम दिले. दोन बाय तीन किंवा चार फुटांच्या 24 विद्युत बॉक्सला रंग दिला. या कामासाठी 50 हजारदेखील खर्च आला नसताना बाजार समितीने 1 लाख 94 हजार 794 रुपयांचे बिल अदा केले. तर, ठेकेदाराने बक्षिसी म्हणून 1580 रुपये बाजार समितीला सूट दिल्याचे नमूद केले आहे.

ठेकेदार निवडला धाराशिवचा !

धाराशिव येथील जे. के. इलेक्ट्रिकल्स या ठेकेदारासह डी. के. इलेक्ट्रिकल्स, एस. डी. इलेक्ट्रिकल्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर या ठेकेदारांनी या कामासाठी बंद पाकिटात निविदा भरली. मात्र, दोन ठेकेदारांनी एकाच दिवशी दरपत्रक फॉर्म फी भरली असून, पावती क्रमांकमध्ये एक वगळता सलगता आहे. काम नसताना बळजबरीने काम दाखविण्याचा संशयास्पद प्रकार असून, निविदा प्रक्रियेतही रिंग झाल्याचे दिसून येते. केवळ कामे न करता बिले काढण्याच्या उद्देशानेच धाराशिव येथील जे. के. इलेक्ट्रिकल्स ठेकेदार निवडला आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. तर, यावर प्रशासनाकडून बोलण्यास टाळाटाळ केली जात असून सध्या तरी प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;