वादानंतर उल्लू अॅपने एजाज खानचा ‘तो’ शो काढला
अभिनेता एजाज खानचा रिऑलिटी शो ‘हाऊस अरेस्ट’ अश्लील टिप्पणीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी टीका करताच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म उल्लू अॅपने संबंधित शो काढून टाकला. शोमधील एका छोट्या क्लिपने टीकाकारांना आमंत्रण दिले. एजाज खान महिला स्पर्धकांवर अश्लील कृत्ये करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते. राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि एजाज खान यांना या प्रकरणी समन्स बजावल्यानंतर हा शो काढून टाकण्यात आला. दोघांनाही 9 मे रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List