वजन कमी करण्यासाठी 6 6 6 वॉकिंग फॉर्म्युला नेमक आहे तरी काय? याबद्दल जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी 6 6 6 वॉकिंग फॉर्म्युला नेमक आहे तरी काय?  याबद्दल जाणून घ्या

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अस्वस्थ आहारामुळे अनेकांना वजन वाढण्याची चिंता सतावत असते. वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक पद्धती अवलंबतात. काही जण व्यायामाची मदत घेतात तर काही जण त्यांच्या आहारात बदल करतात. तसेच आजच्या या फिटनेसच्या जगात, नवीन ट्रेंड आणि नियम येत राहतात जे लोकांना फिटनेस मिळविण्यात मदत करू शकतात. दरम्यान आणखी एक नवीन फॉर्म्युला उदयास आले आहे जे खूप लोकप्रिय होत आहे.

याला 6-6-6 फॉर्म्युला म्हणतात जी लोकं त्यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे हा फॉर्म्युला व्यस्त लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते कारण यामध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फक्त चालावे लागते. या लेखात आपण जाणून घेऊयात की 6-6-6 फॉर्म्युला काय आहे? ते कसे पाळावे आणि शरीराला त्यातून कोणते फायदा होऊ शकतो.

नेमक काय आहे हा 6-6-6 वॉकिंग फॉर्म्युला?

6-6-6 वॉकिंग करण्याच्या नियमात तुम्हाला सकाळी 6 मिनिटे वॉर्म अप करावे लागेल आणि नंतर 60 मिनिटे चालावे लागेल. यानंतर शरीराला 6 मिनिटे थंड करावे लागते. जर तुम्ही ते नियमितपणे पाळले तर वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

6-6-6 फॉर्म्युला शरीराला कोणते फायदे देतो?

कॅलरीज बर्न होतात – वॉकिंग फॉर्म्युलासह तुम्ही दररोज 60 मिनिटे चालता, ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील फॅट देखील कमी होते आणि वजन हळूहळू कमी होऊ लागते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर- जेव्हा तुम्ही नियमितपणे चालता तेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

ताण कमी करण्यास उपयुक्त – वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक समस्यांमुळे अनेक लोकांच्या ताणतणावाची पातळी वाढते. पण चालण्यामुळे शरीरातून एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात, जे ताण कमी करण्यास मदत करतात.

ऊर्जा वाढवा- जेव्हा तुम्ही सकाळी 6 मिनिटे वॉर्म अप करून चालता तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर उर्जेने भरलेले राहते आणि तुम्हाला थकवा जाणवत नाही.

6-6-6 वॉकिंग फॉर्म्युल्याचे नियम कसे पाळायचे

तुम्हाला वॉर्म-अपने सुरुवात करावी लागेल. यासाठी तुम्ही हलके स्ट्रेचिंग किंवा जॉकींग करू शकता. यानंतर तुम्हाला 60 मिनिटे चालावे लागेल. तुम्ही हे 30-30 मिनिटांच्या अंतराने देखील करू शकता. चालल्यानंतर, तुम्ही तुमचे शरीर थंड करण्यासाठी योगासने किंवा ध्यान करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉक, कुठे, कधी, वेळ तर जाणून घ्या पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉक, कुठे, कधी, वेळ तर जाणून घ्या
मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकल अविरत धावत असते. रोजच्या रोज लाखो प्रवाशांचा, चाकरमान्यांचा भार वाहणाऱ्या या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वेळोवेळी देखभालीच्या,...
‘पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे आणि आपल्यावर फक्त 1…’, आर माधवनने वास्तवावर ठेवलं बोट
Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा
WAVES 2025: संगीतापासून चित्रपट निर्मितीपर्यंत… ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ च्या विजेत्यांची यादी
अजितदादांची घाई, नाराज मेधाताई; इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत ‘नाराजी’ नाट्य
व्हॉट्सअ‍ॅपवरून द्या तिरुपती बालाजी मंदिराचा फीडबॅक
पोलीस आयुक्तालयाच्या बुद्धीचा ‘फिटनेस’ गेला, ध्वजारोहणाच्या परेडसाठी मुदत संपलेली गाडी! RTO चे नियम वाहतूक शाखेने पायदळी तुडवले