संजू सॅमसन आणि वाद; KCA ची एस श्रीसंतवर अॅक्शन, घातली 3 वर्षांची बंदी
टीम इंडियाचा माजी खेळाडू एस श्रीसंतवर केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) तीन वर्षांची बंदी घातली आहे. संजू सॅमसनची बाजू घेत श्रीसंतने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान एक वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरुन केरळ क्रिकेट असोसिएशनने एस श्रीसंतवर निलंबनाची कारवाई केली आहे. श्रीसंत सध्या केरळ क्रिकेट लीगमध्ये कोल्लम एरीस या संघाचा सहमालक आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हिंदुस्थानी संघात संजू सॅमसनची निवड करण्यात आली नव्हती. यावरुन एस श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनवर टीका केली होती. श्रीसंतने केलेली टीका खोटी आणि अपमानास्पद असल्याचे केसीएने म्हंटल आहे. यासंदर्भात 30 एप्रिल रोजी बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये श्रीसंतच्या निलंबनावर शिक्का मोर्तब करण्यात आला. त्याचबरोबर केसीएने संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ आणि इतर दोघांवर नुकसानभरपाईचा दावा ठोकणार असल्याचे म्हंटल आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी केसीएने एस श्रीसंत, कोल्लम संघ, अलाप्पुझा संघाचे प्रमुख आणि अलाप्पुझा रिपल्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
सीमेवरील तणावामुळे क्रिकेटचे टाइम टेबल कोलमडणार, काही मालिका रद्द होण्याची शक्यता
श्रीसंतने एका मल्याळम टीव्ही चॅनलवर चर्चे दरम्यान संजू सॅमसनेच समर्थन करताना केसीएवर आरोप केला होता. श्रीसंतने केलेल्या आरोपानुसार, विजय हजारे करंडकासठी केरळ संघामधून संजू सॅमसनला वगळण्यात आलं होतं. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हिंदुस्थानी संघातील त्याच्या निवडीवर परिणाम झाल्याचं, श्रीसंतने म्हंटल होतं. श्रीसंतच्या या वक्तव्यावर केसीएने नाराजी व्यक्त केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List